fbpx

प्रज्ञा पंडित

प्रा. प्रज्ञा पंडित ह्या सुप्रसिद्ध लेखिका, कवियत्री आणि निवेदिका आहेत. त्यांची आजवर १० पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमही त्या राबवतात. ह्याच बरोबर मराठी तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि इतर सामाजिक विषयांवर अनेक शिबिरे आणि कार्यशाळा त्या नियमित आयोजित करीत असतात. जोश talks आणि इतर अनेक प्रख्यात मंचांवर त्यांनी भाषणे केली आहेत. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याबाद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या 'ठाणे गुणीजन २०२२' ह्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Re Manaa By Dr. Suchitra Naik

Re Manaa | रे मना… डॉ. सुचित्रा नाईक यांचे ‘मनाला’ भिडणारे पुस्तक!

Re Manaa | रे मना : आयुष्य सर्वच स्तरावर गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक झाले आहे. ताण तणाव पदोपदी आणि क्षणोक्षणी आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बाब सर्वच वयोगटात लागू होत आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक सर्वानाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आधुनिक जगातल्या समस्यांवरचा प्रभावी उपाय म्हणजे समुपदेशन आधुनिक जगात जवळजवळ प्रत्येक…

पुढे वाचा...
Amrutatulya

Amrutatulya: अमृततुल्य!

Amrutatulya: हल्ली हा शब्द चहाच्या वर्णनासाठीच मुख्यत्वे वापरला जातो. अर्थात माझ्यासारख्या चहा प्रेमींना तो शब्द यथार्थच वाटेल परंतु तरीही माझ्या मते अमृत तुल्य म्हंटले की एकच पेय नजरेसमोर येते, ते म्हणजे उसाचा रस! गोड, मधुर, तृप्तीदायक असा उसाचा रस आरोग्यासाठी फारच गुणकारी आहे. सतत पित्ताने त्रासलेल्या आणि त्यामुळे इच्छा असूनही चमचमीत पदार्थ खाऊ न शकणाऱ्या…

पुढे वाचा...
Sarojini Naidu

Sarojini Naidu – Nightingale of India: भारताची कोकिळा सरोजिनी नायडू

Sarojini Naidu: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राण पणाला लावलेली, आपले सर्वस्व अर्पण केलेली, आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून आपले अमूल्य योगदान दिलेली प्रत्येक व्यक्तिमत्त्व होती. त्यातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या उदंड कार्यांमुळे आपल्या मनात घर करून राहिल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सरोजिनी नायडू. भारताची कोकिळा असे ज्यांना संबोधले जाते त्या सरोजीनी नायडु यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात…

पुढे वाचा...
Savitribai Phule

Savitribai Phule: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

Savitribai Phule: काही व्यक्ती, काही प्रभृती ज्यांना आपण प्रत्यक्षात कधीही भेटलो नाही, बघितले नाही तरीही, त्यांच्या बद्दल आपल्या मनात अत्यंत आदर असतो. कारण त्यांच्या कार्यरुपी पुण्याईच्या बळावर आपण आज आपल्याला हवे असणारे, सन्माननीय आयुष्य जगत असतो. ज्या माय मराठी भूमीत आपला जन्म झाला त्या आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक संत महंत, कर्तबगार – कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म…

पुढे वाचा...
Hirvya Suktanchya Pradeshat

Hirvya Suktanchya Pradeshat: हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात – पुस्तक परीक्षण

Hirvya Suktanchya Pradeshat: काही पुस्तके त्यांच्या शीर्षकांनीच औत्सुक्य निर्माण करतात. ही नावीन्यपूर्ण शीर्षके ती पुस्तके कथा संग्रह आहेत, कादंबरी आहे की काव्य संग्रह याबद्दल कमालीचे कुतूहल निर्माण करणारी असतात. आणि म्हणूनच ती लक्षवेधी ठरतात. मुळात कोणत्याही प्रकारचे लेखन हे त्या लेखकाची कल्पनाशक्ती, वैचारिक परिसीमा, सद्सद्विवेक बुध्दी, सामाजिक जाणिवा, संवेदनशीलता स्पष्ट करत असते. एकूणच लेखनात दिसून…

पुढे वाचा...
Diwali Faral

Diwali Faral: घरी बनवायचा की तयार आणायचा?

Diwali Faral: गौरी गणपती, नवरात्र सरले की वेध लागतात दिवाळीचे! अनेकांना अनेक गोष्टींसाठी दिवाळी आवडते. काहींना शाळा, कॉलेजना भरभक्कम सुट्टी असते म्हणून आवडते तर काहींना सगे सोयरे भेटतील म्हणून. परदेशस्थ बांधवांना मायदेशी यायचे निमित्त म्हणून, तर अर्थात सगळ्यांना मनसोक्त फराळाचा आस्वाद घेता येईल म्हणून! Diwali Faral: दिवाळीचा ‘फराळ’ खास हो, बरोबर… आता सगळे पदार्थ वर्षभर…

पुढे वाचा...
Shubhangi Keer

Famous YouTuber Shubhangi Keer: शुभांगी कीर – यशस्वी यू ट्यूबर

Shubhangi Keer: खुप वर्षांपूर्वी झी टिव्हीवर संजीव कपूर यांनी ‘खाना खजाना’ या रेसिपी शो ला सुरुवात केली. तो पर्यंत पाककलेबद्दल, निरनिराळ्या पाककृतीं बद्दल माहीती हवी असल्यास पुस्तकांचाच आधार होता. पाककलेवर आधारित असंख्य पुस्तकेच तेव्हा बाजारात उपलब्ध होती. परंतु प्रत्यक्षात तो पदार्थ बनवून दाखवत तो शिकवणे हे मात्र भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच घडत होते. त्या रेसिपी शो…

पुढे वाचा...
तृप्ती मोकाशी कोलाबकर

तृप्ती मोकाशी कोलाबकर: ड्रीम प्लॅनेटचे ‘स्वप्न’ साकारणारी यशस्वी उद्योजिका

ठाणे शहरातील कोलबाड परिसरात तुम्ही एखादा पत्ता शोधत असाल किंवा एखाद्याला सांगत असाल तर लँडमार्क म्हणून तुम्ही ‘ड्रीम प्लॅनेट’चा उल्लेख नक्की करालच. कोलबाड मध्ये आलात आणि ड्रीम प्लॅनेट दिसले नाही असं क्वचितच घडेल. ड्रीम प्लॅनेट नर्सरी आणि प्रीस्कूल ही या भागातली नावाजलेली संस्था. या संस्थेचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक डोलारा मागची सोळा वर्षे एकहाती सांभाळणाऱ्या सौ.तृप्ती…

पुढे वाचा...