fbpx

Tiger 3 Vs The Marvels: टायगर 3 विरुद्ध द मार्व्हल्स, टायगरने जिंकली IMAX थिएटरची लढाई, आगाऊ बुकिंगही बंपर

Tiger 3 Vs The Marvels Box Office Clash

सिने रसिकांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने धमाकेदार होणार आहे कारण या दिवाळीत ‘टायगर ३’ आणि ‘द मार्व्हल्स’ हे दोन बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्ही चित्रपट ऐन दिवाळीत म्हणजेच दहा नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत यामुळे यंदाची दिवाळी ॲक्शन आणि थरारपट सिनेप्रेमींसाठी खास असेल यात शंका नाही. भाईजानच्या फॅन्सना ‘टायगर ३’ मध्ये पुन्हा एकदा सलमान खान आणि कॅटरिना कैफची जोडी पाहायला मिळणार आहे. तर ‘द मार्व्हल्स’ मध्ये मार्व्हल्सचे सुपर हीरोज धमाल उडवणार आहेत. हे चित्रपट रिलीज होण्यासाठी अजून काही दिवस आहेत पण ‘टायगर 3 विरुद्ध द मार्व्हल्स’ ची ही लढाई आतापासूनच रंगताना दिसत आहे.

‘टायगर 3’ ने भारतातील सर्व IMAX स्क्रीन आरक्षित केल्या आहेत

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांचा ‘टायगर 3’ आणि बहुप्रतिक्षित अमेरिकन सुपरहिरो चित्रपट ‘द मार्व्हल्स’ बॉक्स ऑफिसवर टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहेत. पण ‘टायगर 3’ एक पाऊल पुढे गेला. त्याने देशभरातील सर्व IMAX स्क्रीन आरक्षित केल्या आहेत. अशा परिस्थितीत ‘द मार्व्हल्स’ ला IMAX स्क्रीन्स मिळू शकणार नाहीत आणि याचा परिणाम या चित्रपटाच्या कमाईवर देखील नक्कीच होणार आहे. परदेशात ‘टायगर 3’ च्या आगाऊ बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर तिथून एक चांगली बातमी येत आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ इतकाच चांगला प्रतिसाद या चित्रपटालाही मिळत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार परिणाम

यशराज फिल्म्स ने सलमान खानच्या टायगर 3 साठी चांगलीच पूर्व तयारी केलेली दिसत आहे त्यांनी या चित्रपटासाठी भारतातील सर्व आयमॅक्स चित्रपटगृहे आरक्षित केली आहेत. त्यामुळे आता टायगर 3 हा चित्रपट सर्व 23 IMAX थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘मार्व्हल युनिव्हर्स’च्या रसिकांना देशभरातील आयमॅक्समध्ये हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि प्रत्येकाला माहित आहे की IMAX स्क्रीनवर मार्वल चित्रपट पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम नक्कीच कमाईवर होईल.

वंदे महाराष्ट्र ला मिळालेल्या या अपडेट नुसार, तुम्हाला ‘द मार्व्हल्स’ बघायचा असेल तर IMAX स्क्रीन्स वर तो उपलब्ध नसल्याने तुम्हाला इतर पर्याय शोधावे लागतील.

Tiger 3 Vs The Marvels: टायगर 3 विरुद्ध द मार्व्हल्स

सलमान खानच्या चित्रपटाच्या ओव्हरसीज बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. प्राप्त प्रारंभिक आकडे उत्कृष्ट आहेत. रिलीज होण्याच्या केवळ 13 दिवस आधी, सुमारे 150,000 यूएस डॉलर (सुमारे 1 कोटी 24 लाख 89 हजार भारतीय रुपये) ची विक्री नोंदवली गेली आहे. अलीकडच्या काळात ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे दोन चित्रपट आहेत ज्यांनी यावर्षी परदेशी बॉक्स ऑफिसवर ध्वज फडकावला आहे. ‘टायगर 3’ ला युनायटेड किंगडम आणि UAE मध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत यूकेमध्ये जवळपास 3 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. तर यूएईमध्ये सुमारे 1600 तिकिटांची विक्री झाली आहे. या आकड्यांनुसार ‘टायगर 3’ ने आगाऊ तिकीट विक्रीत शाहरुख खानच्या ‘जवान’च्या जवळपास 70 टक्के आणि ‘पठाण’च्या 60 टक्के कमाई केली आहे.

भारतात कधी सुरु होणार ‘टायगर 3’ ची अॅडव्हान्स बुकिंग?

भारतात ‘टायगर 3’ ची अॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबरपासून म्हणजेच एक आठवडा आधी सुरू होईल. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा दिवस रविवार असल्याने आणि भविष्यात दिवाळी सण आणि सुट्ट्या असल्याने या सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळेल, अशी पूर्ण आशा आहे.