fbpx

Chandrayaan-3 : चंद्रयान -3 चे मून लँडिंग यशस्वी

Chandrayaan-3 : चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश म्हणून भारताने इतिहास रचला आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आणि अवकाश शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारत हा दिवस कायम लक्षात ठेवेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

चंद्रयान -3 (Chandrayaan-3) शेवटच्या टप्प्यात खरी परीक्षा

चंद्रयान -3 (Chandrayaan-3) मिशनची खरी परीक्षा लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यापासून सुरू झाली. लँडिंगच्या 20 मिनिटांपूर्वी, इस्रोने ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) सुरू केले. यामुळे विक्रम LM ने पुढील सूत्रे हातात घेतली. आपल्या ऑनबोर्ड संगणकाची आणि तर्कशास्त्राची मदद घेऊन विक्रम ने अनुकूल जागा हेरली आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले.

चंद्रयान -3 (Chandrayaan-3)चे विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगसाठी खाली उतरले तेव्हा मिशनच्या यशासाठी अंतिम 15 ते 20 मिनिटे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे तज्ञांचे म्हणणे होते. देशभरातील आणि जगभरातील भारतीयांनी चंद्रयान -3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी लँडिंगसाठी केलेली प्रार्थना अखेर कामी आली.

लँडिंगच्या शेवटच्या 20 मिनिटांत अयशस्वी झालेल्या भारताच्या दुसऱ्या चंद्र मोहिमेचा इतिहास पाहता, या वेळी इस्रोने या प्रक्रियेत जास्त सावधगिरी बाळगली होती. चंद्रावर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी अंतराळयानाला जास्त धोका असल्यामुळे, हा कालावधी “२० मिनिट टेरर” म्हणून संबोधला जातो. या टप्प्यातले धोके कमी करण्यासाठी इस्रोने ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स तयार केला होता ज्याद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया ऑटोमॅटिक (स्वायत्त) झाली आणि विक्रम लँडरने योग्य वेळी आणि उंचीवर स्वतःचे इंजिन प्रज्वलित केले. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, इसरो (ISRO) च्या या निर्णयामुळे लँडिंग सोपे झाले.

हे ही वाचा : चंद्रयान-3 मोहिमेची संपूर्ण टाइमलाईन

चंद्रयान -3 चे यश जागतिक अवकाश संशोधनासाठी मैलाचा दगड

भारताच्या चंद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेचे यश हे केवळ देशासाठीच नव्हे तर जागतिक अवकाश संशोधनासाठीही मैलाचा दगड आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सांगितले की, चंद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेशी संबंधित सर्व क्रियाकलाप वेळापत्रकानुसार आहेत आणि सर्व यंत्रणा सामान्यपणे कार्यरत आहेत.

ISRO चं काम सुरु

एकीकडे तमाम भारतीय आपली नवीन वैज्ञानिक उपलब्धी साजरी करत असताना दुसरीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने मात्र या मोहिमेचे पुढील काम करण्यास सुरवात केली आहे. लुनार रोव्हर ‘प्रज्ञान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ऐतिहासिक टच-डाउनच्या काही तासांतच भारताच्या अंतराळ यानाच्या लँडरवरून उतारावरून खाली सरकला, असे भारतीय अंतराळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सांगितले की, चंद्रयान -3 (Chandrayaan-3) रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाच्या खनिज रचनेच्या विश्लेषणासह 14 दिवसांपर्यंत प्रयोग करेल. एक्स वर ट्विट करताना इस्रोने म्हटले आहे, “चंद्रयान -3 (Chandrayaan-3) मिशन च्या सर्व क्रिया वेळापत्रकानुसार आहेत. सर्व यंत्रणा सामान्य आहेत. लँडर मॉड्यूल पेलोड्स ILSA, RAMBHA आणि ChaSTE आता चालू आहेत. रोव्हर मोबिलिटी ऑपरेशन्स सुरू झाल्या आहेत. शेप पेलोड चालू आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल रविवारी चालू केले होते.”

चंद्रयान -3 रोव्हर ते MOX, ISTRAC, मून वॉक सुरू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *