fbpx

आम्ही कोण?

आमची ओळख

नमस्कार महाराष्ट्र्र!

वंदे महाराष्ट्र!

प्रा. प्रज्ञा पंडित आणि मनिष पंडित यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या ब्लॉग मध्ये मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला गेला आहेच पण त्याच बरोबर तंत्रज्ञान, क्रीडा आणि मनोरंजन ह्या विषयांवरही लिहिले गेले आहे.

प्रा. प्रज्ञा पंडित ह्या सुप्रसिद्ध लेखिका, कवियत्री आणि निवेदिका आहेत. त्यांची आजवर १० पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमही त्या राबवतात. ह्याच बरोबर मराठी तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि इतर सामाजिक विषयांवर अनेक शिबिरे आणि कार्यशाळा त्या नियमित आयोजित करीत असतात. जोश Talks आणि इतर अनेक प्रख्यात मंचांवर त्यांनी भाषणे केली आहेत. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याबाद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘ठाणे गुणीजन २०२२’ ह्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

श्री. मनिष पंडित हे लेखक, निवेदक आणि चित्रपट समीक्षक आहेत. त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. चित्रपट, क्रिकेट आणि तंत्रज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. व्यक्तिमत्व विकास आणि इतर सामाजिक विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. ह्या विषयांवर अनेक शिबिरे आणि कार्यशाळाही ते आयोजित करीत असतात. त्यांच्या Blogging च्या आवडीतून ह्या मंचाची कल्पना पुढे आली आणि आता ती प्रत्यक्षात उतरली आहे.

परिचय

वंदे महाराष्ट्र साठी लेखन करण्याची इच्छा आहे?

तुमचे लेख, बातम्या ‘वंदे महाराष्ट्र’वर प्रसिद्ध करू शकता. हे लिखाण पूर्णतः तुमचे स्वतःचे असावे.