fbpx

NordPass released the list of Most Common Passwords of 2022: नॉर्डपास तर्फे सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर

Most Common Passwords

NordPass released the list of Most Common Passwords: भारतात डिजिटल क्रांती मुळे जवळ पास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे.  अनेकजण डेस्कटॉप कॉम्पुटर, टॅब्लेट्स आणि लॅपटॉप्सही वापरतात.  स्मार्टफोन्सचा वापर वाढल्याने अनेक जण फेसबुक, व्हॉट्सॲप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करीत आहेत. सर्व प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट किंवा बँक अकाउंट्स वापरण्यासाठी पासवर्डचा वापर आवश्यक आहे.

पासवर्ड ठेवणे हे कौशल्याचे काम

पासवर्ड ठेवणे खूपच कौशल्याचे काम आहे. आजच्या डिजिटल युगात कुठलेही अकाउंट वापरताना पासवर्ड देणे गरजेचे आहे त्यामुळे अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची आणि ते योग्य तिथे न विसरता वापरण्याची कसरत आपल्या पैकी प्रत्येकालाच करावी लागते.  पासवर्ड लक्षात राहावा यासाठी अनेक जण सोपे पासवर्ड ठेवतात. परंतु, सोपे पासवर्ड ठेवल्यास लवकर क्रॅक केले जावू शकतात आणि सायबर गुन्हेगार तुमचं अकाउंट हॅक करू शकतात.  तुमच्या अकाउंटचा गैरवापर होऊ शकतो, तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते आणि कित्येकदा आर्थिक नुकसानही होऊ शकते.  सायबर हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना पासवर्ड म्हणून सहज अंदाज लावता येण्याजोग्या अक्षरांचा आणि आकड्यांचा वापर चिंताजनक आहे.

पासवर्ड सेट करताना ते क्रॅक करता येणार नाहीत इतके अवघड आणि विसरले जाणार नाहीत इतके सोपे असावे लागतात तसेच ते वेळोवेळी बदलावेही लागतात. त्यामुळे आजकाल पासवर्ड ठेवणे हे कौशल्याचं काम झालं आहे.  पण काळाची गरज ओळखून हे कौशल्य आतमसात करणे आणि त्यात प्राविण्य मिळविणे आता आवश्यक झाले आहे.

नॉर्डपासतर्फे सांख्यिकीय विश्लेषण

आपले पासवर्ड सुरक्षित राहावेत म्हणून बरेच जण नॉर्डपास सारख्या पासवर्ड मॅनेजर ऍप्सचा वापर करतात. या ॲप तर्फे नुकताच एक देशांवर आधारित सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले.  त्यांच्याकडे असलेल्या पासवर्डच्या एकूण डेटापैकी 3TB डेटाबेसचे त्यांनी विश्लेषण केले.  या कामासाठी नॉर्डपासने सायबरसुरक्षा तज्ञ असलेल्या स्वतंत्र संशोधकांचे सहकार्य घेतलं.  या संशोधकांनी जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या संकेतशब्दांची (Most Common Passwords) सूची तयार केली आणि या सूचीच्या आधारावर खराब पासवर्डची यादी तयार करण्यात आली आहे.

Most Common Passwords: खराब पासवर्डची यादी

नॉर्डपासे प्रसिद्ध केलेल्या सर्वात खराब पासवर्डच्या यादीनुसार  password, Password@123, password123, Password@1 आणि password1 या पासवर्ड्सचा सर्वाधिक वापर केला जात आहे.

रिपोर्टच्या माहतीनुसार, फक्त password हा शब्द पासवर्ड म्हणून जवळपास ४९ लाख लोक वापरत आहेत ज्यात भारतातील ३४ लाख लोकांचा समावेश आहे.

भारतात दुसरा सर्वात पसंतीचा पासवर्ड 123456 आहे. ज्याला १,६६,७५७ वेळा वापरले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 12345678 हा अंक सर्रास वापरला जाणारा पासवर्ड आहे असे दिसून आले आहे.

चौथ्या नंबरवर Bigbasket आहे. याला ७५ हजार ८१ लोकांनी वापरले आहे.  पासवर्ड मध्ये स्वतःच्या किंवा कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या नावाचा वापर भारतामध्ये सर्रास केला जातो. 

याशिवाय, भारतात qwerty, anmol123 आणि googledummy सारख्या पासवर्ड्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक लोक आपल्या नावाचा वापर पासवर्ड म्हणून केला जातो. ज्यात Indya123 आणि India@123 आदीचा समावेश आहे. iloveyou पासवर्डचा वापर सुद्धा अनेक जण करतात. रिपोर्टमध्ये याची रँकिंग ८१ टक्के आहे.

अमेरिका, कॅनडा, आणि ब्रिटन सारख्या देशात f…kyou, f…koff, f…ckyou1 सारख्या पासवर्ड्सचा जास्त वापर करतात.

हे ही वाचा: 4G to 5G Upgrade Scam: तुम्हाला हे माहित असणे आवश्यक

७३ टक्के पासवर्ड्स मागच्या वर्षाच्या यादीतील

NordPass च्या रिपोर्टनुसार, या वर्षीच्या सर्वात जास्त वापरल्या गेलेल्या २०० पासवर्डच्या यादीमध्ये (Most Common Passwords) ७३ टक्के पासवर्ड्स मागच्या वर्षाच्या यादीतील आहेत. मागच्या वर्षी हा रिपोर्ट प्रकाशित केल्यानंतरही पासवर्ड ठेवण्याच्या सवयींमध्ये फारसा फरक झालेला नाही. जास्तीत जास्त वापरले जाणारे पावर्ड्स ठेवून आपण एकप्रकारे हॅकर्सचे काम सोपे करीत आहोत असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. असे पासवर्ड ब्रेक करण्यासाठी काही सेकंदाचा वेळ लागतो.

Most Common Passwords: सर्वात जास्त वापरले जाणारे २० पासवर्ड

Most Common Passwords: भारतात सर्वात जास्त या 20 पासवर्डचा वापर होतो:

 1. password
 2. 123456
 3. 12345678
 4. bigbasket
 5. 123456789
 6. pass@123
 7. 1234567890
 8. anmol123
 9. abcd1234
 10. googledummy
 11. Indya123
 12. qwerty123
 13. sahilji1
 14. 987654321
 15. kapil*12345
 16. 123456789a
 17. p@ssw0rd
 18. India@123
 19. india123
 20. 12345

आपला पासवर्ड क्रॅक करता येऊ नये यासाठी पुढील गोष्टी करा:

 • फक्त शब्द किंवा आकडे पासवर्ड म्हणून ठेवणे टाळा.  आपल्या पासवर्ड मध्ये अक्षरे आकडे आणि स्पेशल कॅरेक्टर्स (@, #, _, * इत्यादी) यांचे कॉम्बिनेशन असू द्या.
 • पासवर्ड सेट करताना स्वतःचे किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव किंवा जन्मतारीख यांचा वापर टाळा.
 • प्रत्येक अकाउंटला वेगळा पासवर्ड ठेवा.  त्यामुळे एखादा पासवर्ड उघड झाला तर त्याचा धोका त्याच अकाउंट पुरता मर्यादित राहील. 
 • आपला पासवर्ड ठराविक अंतराने नियमित बदला.
 • आपला पासवर्ड सोशल मीडिया, मेल किंवा मेसेंजर ॲप्स वर शेअर करू नका.
 • गुगल आणि इतर वेब ब्राउजर्स वर महत्वाचे पासवर्ड शक्यतो सेव करू नका.
 • आपल्या पासवर्ड इतर कुणालाही देऊ नका.