fbpx

How Vicky Kaushal Became Sam Bahadur: या छोट्याशा गोष्टीमुळे विकी कौशल बनला ‘सॅम बहादूर’! जाणून घ्या काय आहे प्रकरण

Sam Bahadur Vicky Kaushal

How Vicky Kaushal Became Sam Bahadur: विकी कौशलच्या आगामी ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur) या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता पहिल्यांदा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. विकीने पुन्हा एकदा त्याच्या व्यक्तिरेखेशी पूर्णपणे जुळवून घेतले आहे, याचा अंदाज ट्रेलरवरूनच लावला जाऊ शकतो. मात्र, यासाठी विकीला खूप मेहनतही घ्यावी लागली आहे.

How Vicky Kaushal Became Sam Bahadur : विकीने केला खुलासा

चित्रपटातील विकीचा लूक हुबेहुब सॅम माणेकशॉसारखा दाखवण्यात आला आहे. मात्र, विकीला ही भूमिका त्याच्या नाकामुळे मिळाली हे फार कमी लोकांना माहीत आहे. खुद्द विकीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे. अभिनेत्याने सांगितले की निर्मात्यांना त्याचे धारदार नाक खूप आवडले, कारण सॅम माणेकशॉ यांचेही नाक धारदार होते आणि म्हणूनच त्यांना या चित्रपटात ही भूमिका मिळाली.

हे ही वाचा: डिसेंबर 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर जोर दाखविणार ‘हे’ दमदार चित्रपट

विकीने घेतली मेहनत

वंदे महाराष्ट्राला मिळालेल्या माहिती नुसार, विक्कीचा लूक अचूक दाखवण्यासाठी चित्रपटात कोणताही प्रोस्थेटिक मेकअप वापरण्यात आलेला नाही. त्याचबरोबर विकीने त्याच्या भूमिकेसाठी सॅम माणेकशॉची बोलण्याची, चालण्याची आणि उभी राहण्याची शैली कॉपी केली आहे. विकीने या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतली आहे, जी त्याच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येते. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही हेच चमत्कार पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

चित्रपट 1 डिसेंबरला होणार प्रदर्शित

विक्कीसोबतच ‘सॅम बहादूर’मध्ये फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब हे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट या शुक्रवार, १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी रणबीर कपूरचा ‘ऍनिमल’ही मोठ्या पडद्यावर दाखल होतोय, आता या टक्करमध्ये बॉक्स ऑफिसवर कोण कुणाला चिट करणार औत्सुक्याचे ठरणार आहे.