Sports develops personality : खेळातून व्यक्तिमत्व उमलते – प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक
Sports develops personality : “नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात क्रीडा क्षेत्राला फार महत्वाचे स्थान असून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व उमलण्यासाठी खेळ महत्वाची भूमिका बजावतात.” असे मत विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी – बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयीन फुटबॉल सामन्यांचे आयोजन
महाविद्यालयातील जिमखाना समिती, विद्या प्रसारक मंडळाची क्रीडा प्रबोधिनी तसेच लेनोवो स्पोर्ट्स पार्क त्यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फुटबॉल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाविद्यालयीन फुटबॉल सामन्यांचे उदघाट्न करताना प्राचार्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिमखाना आणि स्पोर्ट्स कमिटी प्रमुख डॉ.प्रमोद खराटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. छाया कोरे, सुपरव्हायझर प्रा.अंजली पुरंदरे , ग्राउंड इंनचार्ज प्रतिक तेलंग इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते. फुटबॉल मॅचेस खेळण्यासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या साठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. फुटबॉल सामान्यांच्या नंतर स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
हे ही वाचा : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळ खेळावेत
वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, विद्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्राचार्या म्हणाल्या,” विद्यार्थ्यांनी आपला वेळ मोबाईलपेक्षा मैदानात व्यतित केला पाहिजे. खेळामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व अधिक कणखर होते. अभ्यासाबरोबरच विविध खेळ विद्यार्थ्यांनी खेळावेत. यावेळी प्राचार्यांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली. या कार्यक्रमासाठी स्पोर्ट्स पार्कचे फुटबॉल प्रशिक्षक, प्रतीक तेलंग, डॉ.अनिल ढवळे तसेच अनेक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. प्रमोद खराटे यांचे निवेदन
कार्यक्रमाचे नियोजन आणि निवेदन इंग्रजी विभागप्रमुख डॉ. प्रमोद खराटे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षिका रोहिणी डोंबे, डॉ. प्रकाश जंगले, प्रा. मोहिनी कुलकर्णी, प्रा.हेमंत मिराशी, प्रा.रक्षा पाटोळे, डॉ. मिलिंद तलवारे, प्रा. विक्रांत सनये, प्रा. रोहिदास वाझे, श्री विजय पाटील, श्री. विक्रांत निगडे, राकेश बाईंग तसेच दुर्वेश तनपुरे यांनी मोलाची कामगिरी बजावली.