fbpx

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना : आपल्या सर्वांनाच आपल्या कुटुंबाची काळजी असते. आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय होईल ही चिंता प्रत्येक कर्त्या व्यक्तीला असते. या विवंचनेतून बाहेर पाडण्यासाठी विमा कवच हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक नागरिकांसाठी विम्याचे कवच असणं आवश्यक झाले आहे. परंतु कमी विमा उत्पन्न असलेल्या किंवा गरीब वर्गातील लोकांसाठीही जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही. खाजगी विमा कंपन्यांकडून प्रीमियम आकारला जात असणारा प्रीमियम प्रत्येकाला परवडेलच असा नाही. अशा लोकांसाठी सरकारने अनेक प्रकारच्या जीवन विमा योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय). या लेखाद्वारे आपण याच योजनेची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) एक टर्म इन्शुरन्स प्लान आहे. ही भारत सरकारचे पाठबळ असलेली एक जीवन विमा योजना आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अंदाजपत्रकीय भाषणात फेब्रुवारी २०१५ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना (पीएमजेजेबीवाय) मध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर ग्राहकांचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटूंबाला २ लाख रुपये मिळतात. देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जीवन विम्याचा लाभ पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने ९ मे २०१५ रोजी पीएमजेजेबीवाय सुरू केली होती.

पीएमजेजेबीवाय काय आहे?

 • लक्ष्यगट – जीवन विमा न नोंदवलेले सर्व नागरिक
 • वय व पात्रता – लाभार्थ्याचे वय १८ ते ५० वर्षे असले पाहिजे योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास बँक खाते आवश्यक आहे , जे ५० वर्षे वयाच्या आधीपासून योजनेत सामील आहेत त्यांना वयाच्या ५५ वर्षापर्यॅंत जोखीम संरक्षण मिळते .
 • हप्ता- योजनेसाठी वार्षिक ३३० रु + (सेवाकर )हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक वर्षे १ जून ते ३ मे असेल .
 • विमा लाभ – लाभार्थ्याचा कोणत्याही प्रकारे (नैसगिक किंवा अपघाती ) मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु. अर्थसाहाय्य मिळेल
 • व्यवस्थापन – योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो.

हे ही वाचा : Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : अवघ्या २० रुपयांत मिळणार २ लाखांचे विमा संरक्षण

पीएमजेजेबीवायची वैशिष्टये :

 • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत (पीएमजेजेबीवाय) विमा खरेदी करणाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही.
 • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमामा योजनेच्या (पीएमजेजेबीवाय) माध्यमातून टर्म प्लान घेण्यासाठी कमीत कमी वय १८ वर्ष आणि कमाल वयोमर्यादा५० वर्षे आहे. या पॉलिसीची परिपक्वता (मॅच्योरिटी) वयाचे ५५ वर्ष आहे.
 • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेच्या (पीएमजेजेबीवाय) माध्यमातून टर्म प्लानचे प्रत्येक वर्षी नुतनीकरण (रिन्यू) करावे लागते. यामध्ये अश्योर्ड अमाउंट म्हणजे विम्याची रक्कम २,००,००० रुपये आहे.
 • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी (पीएमजेजेबीवाय) प्रीमियम ३३० रुपये प्रतिवर्ष आहे. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ईसीएसच्या माध्यमातून परस्पर वर्ग केली जाते. योजनेच्या रक्कमेवर बँक प्रशासनिक शुल्क आकारते. त्याचबरोबर या रक्कमेवर जीएसटीही लागू आहे.
 • विमा कव्हरच्या कालावधीत जर विमा धारक व्यक्तीचा मृत्यू झाला तर २ लाख रुपयांची रक्कम त्याच्या कुटुंबीयांना (नॉमिनी) प्राप्त होते.
 • जर पीएमजेजेबीवाय योजनेच्या माध्यमातून विमा कव्हर घेणाऱ्या व्यक्तीने अनेक बँकांमध्ये प्रीमियम भरला असेल तरीही मृत्यू झाल्यानंतर एकूण लाभ दोन लाखाहून अधिक होत नाही.
 • कोणीही व्यक्ति प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना (पीएमजेजेबीवाय) एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी निवडू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने दीर्घ मुदतीचा विमा पर्याय निवडला असेल तर बँक प्रत्येक वर्षी विम्याची प्रीमियम रक्कम त्याच्या बँक बचत खात्यातून परस्पर कट करेल.
 • तुमच्या बँक खात्यातून विम्याची प्रीमियम रक्कम कट झालेल्या दिवसापासूनच तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेची (पीएमजेजेबीवाय) सुविधा मिळेल.
 • पीएमजेजेबीवाय पॉलिसी कोणत्याही तारखेला खेरदी केली असू दे, पहिल्या वर्षासाठी त्याचे कव्हरेज पुढच्या वर्षाच्या ३१ मे पर्यंत वैध राहील.
 • त्यानंतरच्या वर्षात प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेच्या (पीएमजेजेबीवाय) कव्हरसाठी प्रत्येक वर्षी 1 जून रोजी बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम भरून विम्याचे नुतणीकरण केले जाऊ शकते.

पात्रता

 • जे भारताचे रहिवासी आहेत तेच पंतप्रधान जीवन विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • पीएम जीवन योजनेनुसार, पॉलिसीधारकाचे वय केवळ 18 ते 50 वर्षे असावे.
 • पीएम जीवन ज्योती योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला दरवर्षी 330 रुपये प्रीमियम भरावा लागतो.
 • प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते देखील असणे आवश्यक आहे. बँक खाते नसेल बँक खाते कसे उघडावे जाणून घ्या-
 • जसे की आम्ही तुम्हाला आधी सांगितले आहे की या योजनेचा प्रीमियम दरवर्षी ३१ मे रोजी किंवा त्यापूर्वी तुमच्या बँक खात्यातून डेबिट केली जाईल, त्यामुळे तुम्हाला ती रक्कम तुमच्या खात्यात ठेवावी लागेल.

४५ दिवसांचा वेटिंग पिरियड

ज्या नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळवायचा आहे ते पात्रता अटी तपासून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. जर तुम्ही या योजनेअंतर्गत आधीच नोंदणी केली असेल तर तुम्हाला दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. दरवर्षी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापली जाईल आणि तुमचे नूतनीकरण केले जाईल. नावनोंदणीच्या पहिल्या ४५ दिवसांपर्यंत सर्व नवीन खरेदीदार या योजनेअंतर्गत दावा करू शकत नाहीत. ४५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच दावा करता येईल. पहिल्या ४५ दिवसांत कंपनीकडून कोणताही दावा निकाली काढला जाणार नाही. परंतु जर अर्जदाराचा मृत्यू अपघातामुळे झाला असेल तर या प्रकरणात अर्जदाराला पैसे दिले जातील.

अपात्रतेच्या अटी

 • खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव सदस्याच्या जीवनावरील हमी समाप्त केली जाऊ शकते.
 • बँकेत खाते बंद झाल्यास.
  बँक खात्यात प्रीमियम रक्कम उपलब्ध न झाल्यास.
 • वयाच्या ५५ ​​व्या वर्षी.
 • एखादी व्यक्ती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना फक्त एकाच विमा कंपनीकडून किंवा फक्त एकाच बँकेतून घेऊ शकते.

विमा योजना अर्जाची माहिती

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना (पीएमजेजेबीवाय) साठी फॉर्म वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, बांग्ला, कन्नड, ओडिया, तेलुगू आणि तामिल आदि भाषा सामील आहेत.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेशी (पीएमजेजेबीवाय) संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी जनसुरक्षा या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकता.

आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी खाली दिलेली कागदपत्रे तुमच्या कडे आवश्यक आहेत:

 • आधार कार्ड
 • ओळखपत्र (पॅन कार्ड / मतदान कार्ड )
 • बँक खाते
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज कसा कराल?

 • प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जन सुरक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल किंवा तुम्ही आमच्याद्वारे दिलेल्या https://www.jansuraksha.gov.in/ लिंकवर क्लिक करू शकता.
 • येथून तुम्हाला पीएमजेजेबीवाय अर्जाचा फॉर्म पीडीएफ डाउनलोड करावा लागेल.
 • आता जीवन ज्योती विमा योजनेच्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
 • यानंतर, या अर्जात विचारलेली कागदपत्रे संलग्न करा आणि बँकेत जमा करा.
 • लक्षात ठेवा की ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्याच बँकेत तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागेल आणि तुम्हाला दरवर्षी तुमच्या बँक खात्यात प्रीमियमची रक्कम ठेवावी लागेल.

हेल्पलाइन क्रमांक

या लेखात या योजनेची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तरीही त्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकता. वंदे महाराष्ट्र ला मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी 18001801111 / 1800110001 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकता.