fbpx

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : अवघ्या २० रुपयांत मिळणार २ लाखांचे विमा संरक्षण

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana 2023

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक नागरिकांसाठी विम्याचे कवच असणं आवश्यक झाले आहे. परंतु कमी विमा उत्पन्न असलेल्या किंवा गरीब वर्गातील लोकांसाठीही जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही. खाजगी विमा कंपन्यांकडून प्रीमियम आकारला जात असणारा प्रीमियम प्रत्येकाला परवडेलच असा नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) गेमचेंजर ठरत आहे.

जीवनात आणीबाणीची परिस्थिती कधीही उद्भवू शकते. त्यावेळी आपल्याला मोठ्या रकमेची तात्काळ आवश्यकता असते पण बऱ्याचदा एखादा प्रसंग ओढविल्यानंतरच आपल्याला विम्याचे महत्व पटते. बिहारहून मुंबईत कामासाठी आलेल्या रामपालच्या बाबतीतही असेच घडले. कंत्राटी मजूर म्हणून काम करणाऱ्या रामपालचा रस्ता ओलांडताना अपघात घडला आणि त्याचे कुटुंब मोठ्या संकटात सापडले. त्याच्या उपचारासाठी सुमारे २ लाखांची गरज होती, मात्र ही रक्कम त्याच्या कुटुंबीयांकडे नव्हती. अपघातामुळे होणाऱ्या या खर्चाला भरून काढता येईल, असा कोणताही विमा त्यांनी घेतला नव्हता. हे सर्व पाहून त्यांना विम्याचे महत्त्व कळले. या कुटुंबासारखी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे महागडा विमा हप्ता भरण्यासाठी उत्पन्न नाही. कमी उत्पन्न असलेल्या किंवा गरीब वर्गातील लोकांसाठीही जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) फार मोलाची ठरत आहे.

फक्त २० रुपये वार्षिक प्रीमियममध्ये आर्थिक सुरक्षा मिळणार

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारने २०१५ मध्ये सुरू केलेली एक विमा योजना आहे. यामध्ये अपघात झाल्यास २ लाखांपर्यंतचे संरक्षण दिले जाते. PMSBY चा उद्देश भारतातील मोठ्या लोकसंख्येला सुरक्षा प्रदान करणे आहे, ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी २० रुपये इतके वार्षिक प्रीमियम भरावे लागेल. १ जून २०२२ पासून २० रुपये वार्षिक प्रीमियम केले आहे. १ जून २०२२ पूर्वी प्रीमियम फक्त १२ रुपये होता.

नोंदणी कशी केली जाते?

  • तुमचे खाते असलेल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही PMSBY साठी अर्ज करू शकता.
  • प्रीमियमसाठी तुम्हाला बँक फॉर्ममध्ये संमती द्यावी लागेल की तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल.
  • बँक मित्रही PMSBY योजनेचे घरोघरी जाऊन फायदे मिळवून देत आहेत. यासाठी विमा एजंटशीही संपर्क साधता येईल.
  • सरकारी विमा कंपन्या आणि अनेक खासगी विमा कंपन्यादेखील ही योजना विकतात.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पुरावा आयडी
  • वय प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • संपर्क माहिती
  • बँक खाते पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • नामनिर्देशित तपशील
  • अर्जाचा नमुना (मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगाली,ओरिया, तेलगू, तमिळ किंवा गुजराती).
  • जर तुमच्या बचत बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर अर्जासोबत फक्त आधार कार्ड प्रत सबमिट करावी लागेल.

PMSBY योजनेशी जोडलेले राहण्यासाठी दोन पर्याय

  • दरवर्षी 1 जूनपूर्वी फॉर्म भरा. फॉर्म सबमिट केल्यानंतर बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापून घेईल.
  • दुसरा पर्याय म्हणजे 2 ते 4 वर्षांचे दीर्घकालीन कव्हरेज. जर धारकाने याचा पर्याय निवडला तर, बँकेकडून दरवर्षी खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल.

PMSBY: फायदे कसे मिळवायचे?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील झाल्यानंतर २ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.
अ) अपघाती मृत्यू झाल्यास: अवलंबितांना किंवा कुटुंबीयांना २ लाख रुपये
ब) कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास: अवलंबितांना २ लाख रुपये
क) आंशिक अपंगत्वावर: अवलंबितांना १ लाख रुपये

हे ही वाचाः ‘स्टार’ चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट खरी की खोटी; आरबीआयने दिले उत्तर

PMSBY: लाभ घेण्यासाठी कोण पात्र?

  • या योजनेसाठी वय १८ ते ७० वर्षांदरम्यान असावे. ७० वर्षांनंतर या योजनेचा लाभ मिळत नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • प्रीमियमचे पैसे थेट बँक खात्यातून डेबिट केले जातात.
  • खात्यात बॅलन्स नसल्यास पॉलिसी रद्द केली जाईल.
  • बँक खाते बंद झाल्यास पॉलिसी लॅप्स होईल.
  • तुमच्याकडे अनेक बँक खाती असल्यास फक्त एक बँक खाते योजनेशी जोडले जाऊ शकते.

नूतनीकरण कधी करू शकतो?

या अंतर्गत नावनोंदणीचा ​​कालावधी १ जून ते ३१ मेपर्यंत आहे. म्हणजेच तुम्ही या योजनेचे नूतनीकरण मे महिन्यातच करू शकता. योजनेचा कालावधी एक वर्षाचा असून, दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना नोंदणी प्रक्रिया

या संबंधित तुम्ही PMSBY शी जोडलेल्या बँकेत किंवा विमा फर्ममध्ये जाऊन स्वतःची नोंदणी करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला PMSBY फॉर्म प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2023 या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून म्हणजेच सरकारच्या जनसुरक्षा वेबसाइटवरून डाउनलोड करावा लागेल, हा योजना फॉर्म विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. किंवा

  • तुम्हाला ज्या बँकेत योजनेसाठी नोंदणी करायची आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटवर PMSBY नोंदणी फॉर्म शोधा आणि तो डाउनलोड करा.
  • आवश्यक वैयक्तिक आणि बँक तपशीलांसह फॉर्म भरा.
  • तुमच्या ओळखपत्राच्या पुराव्याची छायाप्रत आणि पत्ता पुरावा यासारखी आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • भरलेला फॉर्म कागदपत्रांसह बँकेत जमा करा.
  • योजनेनुसार प्रीमियमची रक्कम भरा.
  • बँक तुम्हाला नोंदणीसाठी पोचपावती देईल.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचा तपशील पुढील प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल.
  • यामध्ये हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की योजना लागू करण्यासाठी सरकारने अधिकृत केलेल्या बँका किंवा इतर वित्तीय संस्थांद्वारे देखील PMSBY चा लाभ घेतला जाऊ शकतो. शिवाय, पात्र व्यक्ती उपलब्ध असल्यास बँकेच्या मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी काय कराल?

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेसंबंधी कुठलेही अर्ज डाऊनलोड तुम्हाला करायचे असतील, तर तुम्हाला जनसुरक्षा या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल. Forms चा पर्याय या होम पेजवर तुम्हाला दिसेल, आता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पेजवर तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.