fbpx

Navagrah Stotra : नवग्रह स्तोत्र 

Navagrah Stotra

नवग्रह स्तोत्र | Navagrah Stotra : सूर्यमालेतल्या नऊ ग्रहांना हिंदू धर्मात देवता मानले गेले आहे आणि या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्री व्यास ऋषींनी नवग्रह स्तोत्राची रचना केली. हे हिंदू धर्मातील एक अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे जे नवग्रहांची म्हणजेच सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, व केतु यांची स्तुती करणारे स्तोत्र आहे. त्यात सोप्या शब्दांतलं काव्य आहे, ज्याने सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतु या नवग्रहांची कृपाप्राप्तीसाठी केलेली प्रार्थना आहे. ग्रहांच्या स्थानांचे नकारात्मक प्रभाव समाप्त करण्यासाठी आणि पृथ्वीवर शांती, समृद्धी नांदावी म्हणून हे स्तोत्र अत्यंत महत्त्वाचं आहे.

नवग्रह स्तोत्र | Navagrah Stotra

जपाकुसुम संकाशं
काश्यपेयं महद्युतिं
तमोरिसर्व पापघ्नं
प्रणतोस्मि दिवाकरं (रवि)

दधिशंख तुषाराभं
क्षीरोदार्णव संभवं
नमामि शशिनं सोंमं
शंभोर्मुकुट भूषणं (चंद्र)

धरणीगर्भ संभूतं
विद्युत्कांतीं समप्रभं
कुमारं शक्तिहस्तंच
मंगलं प्रणमाम्यहं (मंगळ)

प्रियंगुकलिका शामं
रूपेणा प्रतिमं बुधं
सौम्यं सौम्य गुणपेतं
तं बुधं प्रणमाम्यहं (बुध)

देवानांच ऋषिणांच
गुरुंकांचन सन्निभं
बुद्धिभूतं त्रिलोकेशं
तं नमामि बृहस्पतिं (गुरु)

हिमकुंद मृणालाभं
दैत्यानां परमं गुरूं
सर्वशास्त्र प्रवक्तारं
भार्गवं प्रणमाम्यहं (शुक्र)

नीलांजन समाभासं
रविपुत्रं यमाग्रजं
छायामार्तंड संभूतं
तं नमामि शनैश्वरं (शनि)

अर्धकायं महावीर्यं
चंद्रादित्य विमर्दनं
सिंहिका गर्भसंभूतं
तं राहूं प्रणमाम्यहं (राहू)

पलाशपुष्प संकाशं
तारका ग्रह मस्तकं
रौद्रं रौद्रात्मकं घोरं
तं केतुं प्रणमाम्यहं (केतु)

फलश्रुति 
इति व्यासमुखोदगीतं
य पठेत सुसमाहितं
दिवा वा यदि वा रात्रौ
विघ्नशांतिर्भविष्यति
नर, नारी, नृपाणांच
भवेत् दु:स्वप्न नाशनं
ऐश्वर्यंमतुलं तेषां
आरोग्यं पुष्टिवर्धनं
ग्रह नक्षत्रजा पीडास्तस्कराग्नि समुद्भवा
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासो ब्रुतेन संशय:
इति श्री व्यासविरचित आदित्यादि नवग्रह स्तोत्रं संपूर्णं

हे ही वाचा : संकटनाशन गणेश स्तोत्र