fbpx

प्रज्ञा पंडित

प्रा. प्रज्ञा पंडित ह्या सुप्रसिद्ध लेखिका, कवियत्री आणि निवेदिका आहेत. त्यांची आजवर १० पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमही त्या राबवतात. ह्याच बरोबर मराठी तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि इतर सामाजिक विषयांवर अनेक शिबिरे आणि कार्यशाळा त्या नियमित आयोजित करीत असतात. जोश talks आणि इतर अनेक प्रख्यात मंचांवर त्यांनी भाषणे केली आहेत. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याबाद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या 'ठाणे गुणीजन २०२२' ह्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

जागतिक पर्यटन दिन

जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर

जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. प्रवास करायला आवडत नाही असा माणूस विरळाच. प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जाणे असो किंवा शाळेची कुटुंबाची एखादी सहल असो, अशा अनेक निमित्ताने आपले लहान-मोठे प्रवास सुरू झालेले असतात. त्यानंतर मग पुढील शिक्षणासाठी नोकरीनिमित्त परगावी, परदेशी जाणे…

पुढे वाचा...

राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस 7 नोव्हेंबर

दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस म्हणून ओळखला जातो. कॅन्सर – बस नाम ही काफी है! हो…..  हादरून जायला, गळुन जायला फक्त हा एक शब्दच पुरेसा आहे. एखाद्या आजाराची कुणकुण लागली की मग आपल्याला मिळालेलं निरोगी, सुदृढ आयुष्य आपण किती बेदरकारपणे वाया घालवत जगतोय; निरर्थक गोष्टींची खंत बाळगुन किती कुढत जगतोय या…

पुढे वाचा...

बालदिन – 14 नोव्हेंबर

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. यानिमित्ताने सध्याच्या परिस्थितीतील बाल्य जीवनाबद्दलचा हा आढावा –  आपण वर्षभरात रोजच कोणता ना कोणता खास दिवस साजरा करत असतो.  हे प्रत्येक  दिनविशेष आयुष्याशी निगडित प्रत्येक वैयक्तिक, सामाजिक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे केले जातात.  कोरोनाचा प्रभाव दरवर्षी…

पुढे वाचा...

भारतीय नौदल दिन ४ डिसेंबर

भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो हे  जाणून घेण्यासाठी हा माहितीपर लेख! सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जगभरातील प्रत्येक देशात आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भौगोलिक परिस्थिती नुसार प्रत्येक देशाला समुद्र किनारा लाभला नाही त्यामुळे ज्या देशांना समुद्र किनारा आहे त्या देशात नौदलाचे विशेष महत्त्व असते, यात आपल्या भारत देशाचाही समावेश आहे. स्थापना भारतीय…

पुढे वाचा...

भ्रष्टाचार विरोधी दिवस 31 ऑक्टोबर 

मागील काही दिवसात अनेक ठळक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय दिवसांबद्दल आपण माहिती घेत आहोत. आजचा दिनविशेष आहे ‘ भ्रष्टाचार विरोधी दिवस ‘ ! आपल्यापकी प्रत्येकाने एकदा तरी हा शब्द दुर्दैवाने अनुभवला असेल – तो म्हणजे भ्रष्टाचार! तर आजचा हा दिवस  म्हणजे , 9 डिसेंबर   जगभरात  आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन म्हणून ओळखला जातो. देशातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरूद्ध जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र…

पुढे वाचा...

राष्ट्रीय गणित दिवस : 22 डिसेंबर

आपल्या संपूर्ण शालेय जीवनाच्या अभ्यासात, सर्वात महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित. फक्त उच्च शिक्षणाच्या दृष्टीनेच नाही तर रोजच्या दैनंदिन व्यवहारीक आयुष्यात देखील अविभाज्य घटक असलेला विषय म्हणजे गणित!  असं खूप कमी वेळा होतं की एखाद्याला विचारावं तुझा आवडता विषय कोणता आणि त्याने सांगावं की ‘ गणित ‘ …कारण इतर गद्य विषयांच्या तुलनेने गणिताचा अभ्यास करणे,…

पुढे वाचा...
नवीन वर्षाचे आगमन

नवीन वर्षाचे आगमन: १ जानेवारी 

सिंहावलोकन १ जानेवारी  जुने वर्ष सरेल..नवीन वर्ष येईल! साल, वर्ष, महिना बदलत राहील. काळ वेळ कोणासाठी थांबत नाही, आणि थांबूही नये. कारण साचलेल्या पाण्यापेक्षा प्रवाही पाणीच कायम नितळ,स्वच्छ राहते आणि निसर्ग नियमाप्रमाणे सागरात विलीन होते. वर्षाचा पहिला आणि शेवटचा दिवस ह्यातला काळ म्हणजे आपणच आपल्याभोवती पृथ्वी सारखी स्वप्रदक्षिणाच आहे. वर्षभरात आलेले सुखदुःखाचे प्रसंग, आपण काय कमावलं,…

पुढे वाचा...
मकर संक्रांत

मकर संक्रांत १४ जानेवारी 

नवीन वर्षात नव्या उत्साहात नवी स्वप्ने, नवीन आशा घेऊन येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा मधुर गोड संवादाने सुरुवात होणारा हा मकर संक्रांतीचा दिवस!  सण एक… नावे अनेक! मकरसंक्रात हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला. तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने तर…

पुढे वाचा...