fbpx

World Cancer Day: जागतिक कर्करोग दिवस – 4 फेब्रुवारी

‘शरीरात कोणत्याही भागात होणारी पेशींची uncontrollable वाढ’ अशी कर्करोगाची व्याख्या करता येईल. पण प्रत्येकाचा कॅन्सर वेगळा आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्याचे त्रास वगळे! आजार झाला आहे हे कळल्यापासुन  पेशंट मनाने उन्मळून गेलेले असतात. प्रचंड शारीरिक त्रास, दडपण, भीती, उदासी, हे माझ्या बरोबरच का व्हावं – मी कोणाचं काय वाईट केलं आहे हा सततचा विचार, समोर उभ्या ठाकलेल्या उपचाराच्या खर्चाच्या विचारांनीच खचून गेलेले असतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा करण्यात येऊ लागला. या निमित्ताने वैद्यकीय संस्था आणि सामाजिक संघटना कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवतात. या सर्व सामाजिक उपक्रमाद्वारे सकारात्मक  जनजागृती तर होतच आहे परंतु वैयक्तिक पातळीवर देखील प्रत्येकाने काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

World Cancer Day: कधी साजरा केला जातो?

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस‘ (World Cancer Day) म्हणून संबोधला  जातो. कर्करोग माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने ह्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

4 फेब्रुवारी 2000 रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोइचिरो मत्सुरा आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक शिराक यांनी कॅन्सर विरुद्ध पॅरिसच्या चार्टरवर सही केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा विषय हाताळणारी ही पहिलीच परिषद होती.

हे ही वाचा: कॅन्सर झालाय? सरकारला कळवा

जागतिक आकडेवारी

जागतिक आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोग (Cancer) रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोगाच्या माहितीचा प्रसार करून कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा हा आजार आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली आहार विहार आणि एकंदरीतच बदललेली जीवनशैली! अद्ययावत वैद्यकीय तपासण्या, उपचार पद्धती यामुळे कर्करोग का होतो हे समजले, तरी त्यावर मात करणारी ठोस अशी कायमस्वरूपी उपचारपद्धती आजही हाती लागलेली नाही. उपचारासाठी शेकडो मार्ग उपलब्ध असले तरीही प्रतिबंधात्मक उपाय, आहार व जीवनशैलीतील बदल आणि सजगता हेच पर्याय अवलंबणे हे श्रेयस्कर आहे.

कर्करोगाची आकडेवारी

 • दरवर्षी सुमारे 11.5 दशलक्ष कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळतात.
 • दरवर्षी सुमारे 8 लाख लोक कर्करोगामुळे आपला जीव गमावतात.
 • कर्करोगाने मरण पावलेल्या रुग्णांचे प्रमाण 7.34 टक्के आहे.
 • 75 वर्षांखालील लोकांबद्दल बोलायचे तर, 9.81 टक्के पुरुष आणि 9.42 टक्के महिलांना हा आजार होण्याची भीती आहे.
 • वर्ष 2018 मध्येच कर्करोगामुळे 7 लाख 84 हजार 821 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यात कर्करोगाने मृत्यू झालेल्या पुरुषांची संख्या जास्त होती. 413519 पुरुष आणि 371302 महिला कर्करोगाने मरण पावले. तंबाखूच्या सेवनामुळे 317928 लोकांचा 2018 मध्ये मृत्यू झाला आहे.
 • पुरुषांमधे 25 टक्के लोक तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मरण पावले आहेत, तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे जास्त आहे (World Cancer Day 2021 know the number of cases per year).
 • असेही म्हटले जाते की येथे पाच कर्करोग आहेत, ज्यांची प्रकरणे कर्करोगाच्या सर्व बाबतीत 47 टक्के आहेत. परंतु, त्याच्या बर्‍याच प्रकरणांमध्ये लोकांवर उपचार केले गेले.
 • भारतात दर 8 मिनिटांनी गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाने एका महिलेचा मृत्यू होतो. आयसीएमआरच्या मते, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग हा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे.
 • तंबाखूच्या वापराशी संबंधित कर्करोगाने पुरुष आणि स्त्रियांमध्ये सुमारे 30 टक्के लोक ग्रस्त आहेत.
 • स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतरही 2 पैकी एका महिलेचा मृत्यू होतो.
 • तंबाखूमुळे दररोज 3500 लोकांना कर्करोग होतो.
 • जर आपण कर्करोगाच्या कारणांबद्दल चर्चा केली, तर 17.4 टक्के तंबाखू, अल्कोहोलमुळे 6.5 टक्के आणि संसर्गामुळे 21.7 टक्के लोकांना कर्करोगाची लागण होते.
 • 30 वर्ष ते 69 वर्षांच्या कर्करोगाग्रस्त रुग्णांची संख्या आता 556400 इतकी आहे.

काय करावे, काय टाळावे

 • एक म्हणजे ‘मला काय होणार आहे’ ‘जे होईल ते पाहीलं जाईल’ ‘काही होत नाही मला’ अशा कुठल्याशा विचारधारेवर निर्धास्त राहणेही अयोग्य आणि अति काळजी करत कुढत जगणेही वाईट! तुमचं अंतर्मन तुम्हाला तुमच्या तब्येती विषयी वेळोवेळी जागृत करत असते. कोणी मुर्ख म्हणो, डरपोक म्हणो.. उठुन डाॅक्टर कडे जाऊन व्यवस्थित वेळोवेळी चेकअप करावे.
 • गूगल करुन कोणत्याही आजाराविषयी माहीती गोळा करून स्वतःच स्वतःचे डाॅक्टर बनु नये.
 • मानसिक आधार द्यायला पैसे, वेळ याची काहीच गरज लागत नाही. तुमच्या संपर्कात कोणी पेशंट असतील तर जसा जमेल तसा त्यांचा आधार बना. हा मुद्दा फक्त कॅन्सर पेशंट साठीच लागु नाही..तर अगदी क्षुल्लक आजारात, प्रसंगी मानसिक ताणतणावात असणाऱ्या जवळच्या व्यक्तींचाही आधार बनायला काहीच हरकत नसावी.
 • आजच्या जगात, लवकर निदान झाल्यास कॅन्सर हा 100% बरा होऊ शकणारा प्रॉब्लेम आहे आणि काही प्रसिद्ध सेलेब्रिटी नावामुळे ते सिध्दही झाले आहे.
 • डाॅक्टर्सवर विश्वास ठेवून, मनोबल कायम ठेवुन हा प्रवास यशस्वी करणं हाच याचा कानमंत्र आहे असं आपण म्हणु शकतो!

एखाद्या आजाराची आसपास कुणकुण लागली की मग आपल्याला मिळालेलं निरोगी, सुदृढ आयुष्य आपण किती बेदरकारपणे वाया घालवत जगतोय;  याची जाणीव क्षणार्धात होते. मग अशा वेळी, असा कॅन्सर सारखा गंभीर आजार मनाने पेलण्यासाठी किती मनोधैर्य आणि किती कणखरपणा लागेल याचा अंदाज येतो. आणि म्हणूनच , खूप महाग आणि मौल्यवान असलेले हे निसर्गदत्त आयुष्य स्वस्तात मिळाल्यासारखे न जगता, आपल्या जगण्यात, जीवन शैलीत शिस्तबद्धता आणून जगभरात सर्वत्र असलेल्या कर्करोग प्रसाराचे प्रमाण वाढू न देता ते कमीत कमी व्हावे यासाठी प्रयत्नशील राहूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *