fbpx

Women’s IPL Success : महिला क्रिकेट लीगचे यश

Women's IPL Success

ठळक मुद्दे

Women’s IPL : आयपीएलसारखा माेठा चाहता वर्ग पहिल्यांदाच आयाेजित करण्यात आलेल्या वुमन्स प्रीमियर लीग (Women’s IPL) WPL ला मिळेल की नाही, हा माेठा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमाेर हाेता. मात्र, भारतीय महिला क्रिकेट लीग ला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या आठवड्यातील सामन्यांदरम्यान सर्वाेत्तम कामगिरी करत महिला क्रिकेटपटूंनी जगभरातील चाहत्यांचे लक्ष आपल्या WPL कडे वेधून घेतले. यातून आठवडाभरामध्ये जवळपास ५ काेटींपेक्षा अधिक चाहत्यांनी या लीगला पसंती दर्शवली आहे.

Women’s IPL : चाहत्यांची विक्रमी उपस्थिती

दिल्ली-मुंबई सामन्यादरम्यान ३० हजार चाहत्यांची विक्रमी उपस्थिती ब्राॅडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च काैन्सिलने (बार्क) नुकताच एक अहवाल सादर केला. त्यांनी केलेल्या अध्ययनातून महिला प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्याच आठवड्यात ५ काेटी ७८ हजार टीव्ही व्ह्यूअरशिप नाेंद झाली आहे. जगातील सर्वात लाेकप्रिय मानल्या जाणाऱ्या आयपीएलच्या पहिल्याच सत्रादरम्यान १० काेटींची व्ह्यूअरशिप हाेती. याच्या निम्मी व्ह्यूअरशिप ही महिला प्रीमियर लीगला पहिल्याच आठवड्यात मिळाली. मुंबई-दिल्ली यांच्यातील सामन्यादरम्यान चाहत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यादरम्यान स्टेडियममध्ये ३० हजारांपेक्षा अधिक चाहत्यांनी हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक संख्या युवांची हाेती.

हे ही वाचा : एकदिवसीय विश्वचषक 2023 वेळापत्रक घोषित

Women’s IPL : पुरुष संघांना टाकले मागे

दिल्ली-मुंबईच्या संघांनी सरस खेळी करत पुरुष संघांना मागे टाकले. पहिल्याच हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाने सर्वाधिक १२ गुणांची कमाई करत गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान गाठले. यासह दिल्ली संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश करता आला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पुरुष संघाला फायनल गाठण्यासाठी ११ वर्षांपर्यंत प्रचंड मेहनत करावी लागली. मुंबई इंडियन्स महिला संघाने आता पहिल्याच सत्रात सर्वाधिक विजया मिळवत प्लेऑफचा पल्ला गाठला. मुुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाला आयपीएलमध्ये यासाठी माेठी कसरत करावी लागली हाेती.

सलामी सामन्यापासून आयपीएल-डब्ल्यूपीएलमधील समानता

मुंबई इंडियन्स व गुजरात जायंट्स सलामी सामन्याने महिला प्रीमियर लीगला सुरुवात झाली. मुंबईने महिला लीगच्या पहिल्याच सामन्यात २०० धावांचा आकडा गाठला. या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या गुजरात संघाला ६४ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. यातून मुंबईने १४३ धावांनी सामना जिंकला. आयपीएलच्या पहिल्या सामन्यादरम्यानच्या कामगिरीला डब्ल्यूपीएलच्या सलामीला उजाळा मिळाला. आयपीएलच्या सलामीला काेलकाता संघाने २०० धावांचा आकडा पार केला हाेता. बंगळुरू संघाचा ८२ धावांत खुर्दा उडवत काेलकाता संघाने १४० धावांनी सामना जिंकला हाेता. डब्ल्यूपीएलमध्ये एकाच डावात सर्वाधिक ९९ धावा काढण्याचा विक्रम न्यूझीलंडची महिला फलंदाज साेफी डिव्हाइनने केला. तिचे शतक अवघ्या एका धावेने हुकले पण दोन्ही संघांच्या समर्थकांनी तिला उभे राहून टाळ्या वाजवीत सन्मान दिला.

WPL मधली पहिली हॅटट्रिक

एलिमिनेटर सामन्यात भेदक गोलंदाजी करीत मुंबई इंडियन्सच्या इसी वाँगने इतिहास घडवला. तिने WPL मध्ये पहिल्या हॅटट्रिक घेतली आणि मुंबईला अंतिम सामन्याचं तिकीट मिळवून दिले.

Women’s IPL : मुंबई इंडियन्स ने जिंकली पहिली WPL

२६ मार्च २०२३ ही तारीख इतिहासात स्वर्णाक्षरात लिहिली जाईल. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर एक थरारक फायनल सामना पाहायला मिळाला. भारतीय वुमन्स प्रीमियर लीग २०२३ च्या पहिल्याच सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने दणदणीत विजय मिळवत पहिल्या सीजनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगला. दोन्ही संघांनी पूर्ण जोर लावला पण मुंबई इंडियन्सच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा संघावर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह त्यांनी या लीगमधील पहिले विजेतेपद पटकावण्याचा मानदेखील मिळवला.

Women’s IPL : विमेन्स प्रीमियर लीगचा रन रेट आयपीएल पेक्षा सरस

विमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची पहिली फेरी संपली आहे. बाद फेरीपर्यंत रनरेट 10.48 होता. म्हणजे संघांनी प्रत्येक षटकात 10 पेक्षा अधिक धावा केल्या. हा वेग आयपीएलपेक्षा अधिक आहे. आयपीएलचा रनरेट ८.१४ आहे.

महिला आंतरराष्ट्रीय टी-20 चा रनरेट ५.७८ आहे. म्हणजे प्रत्येक षटकात ६ धावा काढायलाही संघर्ष असतो. पुरुष आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये संघ प्रतिषटक ७.५५ धावा काढतात.

जगात सर्वात वेगवान टी-20 लीग

भारतीय महिला टी-20 लीग जगात सर्वात वेगवान आहे. इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्ये प्रतिषटक सरासरी ८ धावा निघतात. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅशमध्ये रनरेट ७ आहे. लीगमध्ये आतापर्यंत ७३२ चौकार, १४८ षटकार ठोकले गेले ओहेत. मॅकग्रा-लेनिंगने सर्वाधिक ४५-४५ चौकार लगावले.

लेनिंग आणि शेफालीने १६२ धावांची भागीदारी केली. ही सलामीची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.​​​​​​

WPL अवॉर्ड्समध्ये मुंबईचा दबदबा

प्लेयर ऑफ़ द टूर्नामेंट – हॅली मॅथ्यूज, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
प्लेयर ऑफ द मॅच – नॅट सिवर-ब्रंट, मुंबई इंडियन्स (2.5 लाख रुपये)
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) – मेग लेनिंग, दिल्ली कॅपिटल्स (5 लाख रुपये)
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट) – हेली मॅथ्यूज, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
एमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन – यास्तिका भाटिया, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
कॅच ऑफ द सीजन – हरमनप्रीत कौर, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
पावरफुल स्ट्रायकर ऑफ द सीजन – सोफी डिवाइन, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (5 लाख रुपये)
फेयर प्ले अवॉर्ड – मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (5-5 लाख रुपये)

Women’s IPL : लीग भारतीय, चमकल्या बाहेरच्या खेळाडू

भारतीय लीगमध्ये विदेशी खेळाडंूचे वर्चस्व आहे. धावा, चौकार-षटाकारांतही त्या पुढे आहेत. टॉप-५ स्कोअररही विदेशीच आहेत. सर्वाधिक बळी घेण्यात आघाडीच्या ५ मध्ये भारतीय साइका इशाक आहे. मोस्ट व्हॅल्यूएबल टॉप-१५ मध्ये २ भारतीय आहेत.​​​​​​

टॉप-5 रन स्कोअरर

खेळाडू | रन

मेग लेनिंग | 345
मॅक्ग्रा | 295
सोफी डिव्हाइन | 266
अॅलिस पेरी | 253
हिली | 242

टॉप-5 विकेट-टेकर


खेळाडू | विकेट

मॅथ्यूज | 16

अॅक्लेस्टोन | 14
अॅमेलिया केर | 13
इशाक | 13
किम गार्थ | 11

महागडे अपयशी : स्मृतीची १ धाव २.२८ लाख, तर दीप्तीचा १ बळी २८ लाखांचा

आरसीबीने स्मृतीला ३.४० कोटींना खरेदी केले. या सर्वात महाग खेळाडूने ८ सामन्यांत १९ च्या सरासरीने १४९ धावा केल्या. प्रत्येक धाव २.२८ लाखांना पडली.

यूपी वोरीयर्सने दीप्तीला २.६० कोटीत खरेदी केले. तिने केवळ ७४ धावा केल्या, ९ बळी घेतले. अशा स्थितीत एक धाव ३.५१ लाख, तर एक बळी २८ लाखांना पडला.

दिल्ली कॅपिटल्सने जेमिमा रॉड्रिग्सला २.२ कोटींना खरेदी केले. १२६ धावा केल्या. प्रत्येक धाव १.७४ लाखात गेली.

स्वस्त खेळाडू चमकले : १० लाख बेस प्राइससह इशाक बळी टिपण्यात तिसरी

सायका इशाकला मुंबईने १० लाखांत खरेदी केलेे. तिने १३ बळी घेतले. प्रत्येक बळी ७६ हजारांचा.
हेली मॅथ्यूजला मुंबईने ४० लाखांना खरेदी केले. २३२ धावा केल्या, १२ बळी घेतले. प्रतिधाव १७ हजार रुपये, प्रत्येक बळीसाठी ३.३३ लाख मोजावे लागले.

सीझनमध्ये ४ वेळा २०० पेक्षा जास्त धावा

महिला क्रिकेटमध्ये अवघड मानला जाणारा २००+ चा आकडा पहिल्याच सामन्यात झाला. प्रत्येक १० व्या डावात २००+ धावा झाल्या. त्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅशपेक्षा उत्तम आहेत. ८ सीझनमध्ये २००+ धावा चारच वेळा झाल्या.