Women’s IPL (WPL) : 4 मार्च 2023 हा दिवस भारतीय महिला क्रिकेट (women’s cricket) साठी ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी संध्याकाळी साडे सात वाजता महिला प्रीमियर लीग Women’s IPL (WPL) चा पहिला हंगाम सुरू झाला. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम येथे सायंकाळी साडेपाच वाजता पहिल्या हंगामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्या नंतर साडेसात वाजता पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरात जायंट्स वर दणदणीत विजय मिळवला.
इंग्लंडमधील द हंड्रेड वुमन स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग स्पर्धेतनंतर आता भारताच्या Womens Premier League चा नारळ फुटला आहे. या लीग मुळे महिला क्रिकेटच्या (women’s cricket) उज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल हे निश्चित. या लीगमुळे महिला क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर पोहचणार असल्याचे क्रिकेट पंडितांचे मत आहे.
Women’s IPL : दिमाखदार उद्घाटन सोहळा
वूमन्स प्रीमिअर लीगच्या (Women’s IPL ) या हंगामाचा उद्घाटन सोहळ्याला अनेक महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. अनेक नामवंत कलाकारांनी या वेळी आपली कला सादर केली. त्यामुळे हा सोहळा दिमाखदार झाला. सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हा समारंभ सोहळा सुरू झाला. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन आणि कियारा अडवानी आपला परफॉर्मन्स सादर केला. हिप-हॉप गायक एपी ढिलन देखील यावेळी परफॉर्म सादर केला.
या उद्घाटन सोहळ्या आधी शंकर महादेवन, हर्शदीप कौर आणि निती मोहन यांच्यासह 6 गायक Women’s IPL (WPL) चे एंथम गीत सोंग ‘यह तो बस सुरूवात है’ रिलीज केले. या गाण्याचे ट्रेलर आधीच रिलीज झाले आहे आणि त्यामुळे या गाण्याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
Women’s IPL : WPL चे अधिकृत गीत
Women’s IPL (WPL) चे अधिकृत गीत अर्थात महिला प्रीमियर लीग ‘ये तो बस सुरूवात है’ शनिवारी 4 मार्च रोजी लाँच करण्यात आले. BCCI ने ते सुरू केले. BCCI चे सचिव जय शाह आणि WPL ने हे एंथम सोशल मीडियावर पोस्ट केले. शंकर महादेवन, हरदीप कौर आणि नीती मोहन यांनी या गीताला आवाज दिला. तर दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मासह अनेक महिला क्रिकेटपटूही या दोन मिनिटांच्या गीताच्या व्हिडिओमध्ये दिसल्या.
‘ये तो बस सुरूवात है’ हे गीत महिला क्रिकेट आणि काळाबरोबर खेळाच्या प्रगतीबद्दलही बोलते. हे WPL एंथम महिला क्रिकेटचे भावविश्व व्यक्त करत आहे.
WPL ची Lucky Mascot शक्ती
महिला इंडियन प्रीमियर लीगचा शुभंकर (Lucky Mascot ) वाघिण आहे. तिला शक्ती असे नाव दिले आहे. BCCI सचिव जय यांनी गुरुवारी म्हणजेच 2 मार्च रोजी त्याचे प्रकाशन केले. शक्तीला वाघीणीचे रूप दिले आहे.
हे ही वाचा: WPL चे वेळापत्रक
Women’s IPL (WPL) : 7 वाजता टॉस
मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. सायंकाळी 7 वाजता टॉसनंतर अर्ध्या तासानंतर सामन्याचा पहिला चेंडू सायंकाळी साडेसात वाजता फेकला गेला. या सामन्यात मुंबईची कर्णधार हर्मनप्रीत कौर, तर बेथ मुनी गुजरातचाी कर्णधार होती.
Women’s IPL : पिच रिपोर्ट
आतापर्यंत 2 महिला टी -20 आंतरराष्ट्रीय सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळले गेले आहेत. या मैदानावर एकदा सुरूवातीला फलंदाजी करणारा संघ आणि एकदा नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकले आहेत. इथल्या पहिल्या डावातील सर्वात मोठी धावसंख्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे त्यांनी 187 धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियानेच या ठिकाणी 173 धावांच्या सर्वात मोठ्या स्कोअरचा पाठलाग केला आहे. अशा परिस्थितीत, खेळपट्टीवर बराच मोठा स्कोअर पाहावयास मिळू शकतो.
Women’s IPL : असे आहेत संघ
मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर (कर्णधार), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज/क्लो ट्रायॉन, एमिलिया केर, हीथ ग्रॅहम, नताली सीवर ब्रँट, पूजा वास्त्रेकर, अमंजोट कौर, साइका इशाका, नीलम बिश्ट आणि सोनम यादव.
गुजरात जायंट्स: बेथ मुनी (कर्णधार), सोफिया डन्कली, किम गॅर्थ/अण्णाबेल सदरलँड, हार्लिन डीओल, एश्ले गार्डनर, सुषमा वर्मा (विकेटकीपर), तनुजा कनवार, स्नेह राणा, मन्सी जोशी, मोनिका पटेल आणि दयालान.
Women’s IPL : हवामान स्थिती
शनिवारी मुंबईचे तापमान 27 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. पाऊस पडणार नाही आणि रात्रीचे तापमान 29 ते 31 अंश दरम्यान असेल. रात्री 9 नंतर थोड्या प्रमाणात दव पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गोलंदाजी संघांना चेंडू पकडण्यात अडचणी येतील.
स्पर्धा कशी असेल?
या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजार जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि यूपी वॉरियर्स या 5 संघांचा समावेश आहे. या पाच संघात राऊंड रॉबिन पद्धतीने 20 साखळी सामने होणार आहेत. यात प्रत्येक संघ प्रत्येकी 8 सामने खेळणार आहे.
गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट फायनलसाठी पात्र होईल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतिम फेरीसाठी एकमेकांना एलिमिनेटरमध्ये भिडणार. यातील विजेता संघ पहिल्या स्थानावरील संघाशी अंतिम सामना खेळेल.
सामन्याची वेळ काय?
WPL मधील डबल हेडर सामन्यांची वेळ ही आयपीएलप्रमाणेच दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 अशी असणार आहे.