fbpx

World NGO Day: जागतिक एन जी ओ दिवस २७ फेब्रुवारी

World NGO Day

World NGO Day: समाज आपल्यासाठी सतत काही ना काही करत असतो. याचीच जाणीव ठेवून गरजूंना शैक्षणिक मदत, अन्नदान, वस्त्रदान  , शिधा दान या स्वरूपात प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी आपले योगदान हे देत राहिले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी, बेकारी अशा सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याशिवाय अनाथ मुलं, परावलंबी ज्येष्ठ नागरिक या देखील समाजाच्या जबाबदाऱ्याच आहेत. या सर्व बाबींकडे वैयक्तिक आणि स्थानिक पातळीवर लक्ष देऊन त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम ठिकठिकाणच्या अशासकीय सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था म्हणजेच एन जी ओ कर्तव्यनिष्ठेतेने आणि तितक्याच मायेने करत आहेत. या सर्व संस्थांच्या माहितीचा प्रचार , प्रसार , नामोल्लेख आणि गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी २७ फेब्रुवारीला जागतिक NGO दिवस (World NGO Day) साजरा केला जातो.

मानव आणि प्राण्यांसाठी  रात्रंदिवस काम करणाऱ्या समाज सेवकांना , स्वयंसेवकांना  प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय एन जी ओ दिवस साजरा केला जाऊ लागला.

जगभरातील सर्व देशांमध्ये अनेक प्रकारच्या एनजीओ कार्यरत आहेत ज्या  गरजू लोकांना अन्न, निवारा, शिक्षण आणि औषध – उपचार यासारख्या जीवनावश्यक गोष्टी विनामूल्य देतात. 

World NGO Day: प्रथम आयोजन

फिनलंड देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रथमच जागतिक NGO दिनाचे आयोजन केले होते.

एकूण 12 सदस्य राष्ट्रांनी (बेलारूस, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, जर्मनी, आइसलँड, लॅटव्हिया, लिथुआनिया, पोलंड, रशिया, नॉर्वे आणि स्वीडन) अधिकृतपणे हा दिवस   घोषित केला. सर्वात प्रथम 27 फेब्रुवारी 2014 रोजी युनायटेड नेशन्स, युरोपियन युनियन नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी  जागतिक NGO दिवस घोषित  केला.

हे ही वाचा: जागतिक वन्य जीव दिवस ३ मार्च

भारतातील एन जी ओ

सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 2009 मध्ये जाहीर केले की भारतात 3.3 दशलक्ष एनजीओ नोंदणीकृत आहेत, याचा अर्थ प्रत्येक 400 भारतीय नागरिकांमागे एक एनजीओ आहे.

2020 मध्ये, GuideStar India (GSI) च्या पोर्टलवर 10,000 हून अधिक सत्यापित NGO आणि 1,600 हून अधिक प्रमाणित NGO होते.

भारतातील पहिल्या NGO ची स्थापना  श्री गगनेंद्रनाथ टागोर यांनी 1917 मध्ये कोलकाता हातमागातील विणकर आणि कलाकारांना मदत करण्यासाठी केली होती. यासाठी बंगाल होम इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना केली गेली आणि 1917 मध्ये भारतीय कंपनी कायदा VII (कलम 26) अंतर्गत ती नोंदणीकृत झाली.

भारतातील काही प्रमुख एन जी ओ पैकी काही उल्लेखनीय नावे पुढील प्रमाणे आहेत : 

  • गिव्ह इंडिया फाउंडेशन
  • गुंज
  • हेल्पेज इंडिया
  • CRY (बाल हक्क आणि तुम्ही) 
  • केअर इंडिया
  • चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन
  • सन्मान फाऊंडेशन
  • प्रथम. 
  • स्मित वृद्धाश्रम

आपणही आजच्या या दिवसाचे औचित्य साधून आपल्या जवळपासच्या एन जी ओ ची माहिती घेऊन अन्न वस्त्र धन धान्य या स्वरूपातील सामाजिक मदत जरूर अर्पण करावी.