Healthy Sprout Bhel: मोड आलेल्या कडधान्यांची भेळ

Sprout Bhel: भेळ हा प्रकार लहनांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा. मोड आलेल्या कडधान्यांची भेळ चटपटीत आणि पौष्टीकही असते. कशी बनवायची? चला पाहुयात.
Sprout Bhel: साहित्य
- एक वाटी चुरमुरे
- पाव वाटी मोड आलेले मूग
- पाव वाटी बारीक कापलेले टोमॅटो
- अर्धा वाटी पेरूचे तुकडे
- अर्धी वाटी शेव
- पाव वाटी कापलेली कोथिंबीर
- चार छोटे चमचे लिंबाचा रस
- पाव चमचा काळे मीठ किंवा साधे मीठ
- फोडणीचे साहित्य: अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाव छोटा चमचा हळद, अर्धा चमचा तेल
हे ही वाचा: दडपे पोहे
Sprout Bhel: कृती
मोड आणण्याची पद्धत :
प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवा. धुतलेले मूग ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ते स्वच्छ ओल्या कापडामध्ये ८ ते १० तास घट्ट बांधून ठेवा. त्यानंतर मुगाला मोड येतात.
भेळ तयार करण्याची पद्धत:
- एका कढईत तेल घेऊन त्यामध्ये जिरे, हिंग, हळदीची फोडणी तयार करा. त्यात चुरमुरे मिसळा.
- कढई खाली उतरवून त्यात काळे मीठ व शेव टाकून मिश्रण थंड करा.
- नंतर या मिश्रणात मोड आलेले मूग, कापलेला टोमॅटो, पेरूचे तुकडे, कापलेली कोथिंबीर घाला.
- लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या. चटपटीत भेळ (Sprout Bhel) तयार होईल.
टीप: बदलत्या हंगामानुसार आपण वेगवेगळी फळेही या भेळेत टाकू शकता.