fbpx

National Science Day: राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी

National Science Day

National Science Day: राष्ट्रीय विज्ञान दिवस… भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

शालेय अभ्यासक्रमात अनेक विषय असतात. प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे हे विषय काहीना सोपे तर काहींना कठीण वाटतात. त्यातीलच असा एक विषय म्हणजे विज्ञान.  सर्वसाधारणपणे रोजच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञान आपल्याशी कसे संबंधित आहे आणि विज्ञानाची ताकद किती आहे हे बालवयात प्रत्येकाला समजाव यासाठी अभ्यासात अंतर्भूत केलेला हा अत्यंत महत्त्वाचा विषय. या अनुषंगाने या विषयाची गोडी फक्त अभ्यासापुरती मर्यादित न राहता आपला एकंदरीतच सर्व बाबींकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन असणे अपेक्षित आहे. 

National Science Day: का साजरा केला जातो?

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना अनेक योजना सुरू केल्या. त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करणे.

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतातील महान भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक सर सी.व्ही. रमण यांनी प्रकाशाच्या विखुरण्यावर त्यांचा आधुनिक शोध जाहीर केला, ज्याला ‘रमन इफेक्ट’ म्हणून ओळखले जाते. सी.वी. रमण यांनी लावलेल्या “रमन इफेक्ट” च्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day) साजरा केला जातो.

हे ही वाचा: भ्रष्टाचार विरोधी दिवस 31 ऑक्टोबर

डॉ. सी. व्ही. रामन यांचा शोध

भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला.   त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी पाठवला. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. याच निबंधाला १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला . हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च ‘भारत रत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

 भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.

21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे युग मानले जाते आणि ते खरे ठरत आहे.  आज विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान, संगणकीकरण हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच आता नष्ट होत आहेत. हे समाजाच्या प्रगतीचेच लक्षण आहे.

भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा….!