Red Card In Cricket : क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदा रेड कार्डचा वापर, कायरॉन पोलार्डचा संघ खेळला 10 खेळाडूंसह
Red Card In Cricket : क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच रेड कार्डचा वापर करण्यात आला. कायरॉन पोलार्डचा संघ 10 खेळाडूंसह खेळला, ‘स्लो ओव्हर रेट’ ची ही चूक त्रिनबागो नाईट रायडर्सला चांगलीच महागात पडली आणि ड्वेन ब्राव्होच्या शेवटच्या षटकात सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्सने बाजी मारली. तीन गडी. चौकार आणि 1 गगनभेदी षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या.
Red Card In Cricket : पहिल्यांदाच रेड कार्डचा वापर
तुम्ही अनेकदा फुटबॉलच्या मैदानावर रेफ्रींना लाल कार्ड आणि पिवळे कार्ड वापरताना पाहिलं असेल, पण क्रिकेटच्या मैदानावर अंपायरला असं करताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? कदाचित नाही, परंतु वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच चाहत्यांनी रेड कार्डचा वापर झालेला पाहिला. सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध त्रिनबागो नाइट रायडर्स सामन्यादरम्यान कायरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील नाइट रायडर्सला पंचाने रेड कार्ड (Red Card) दाखवले. संघाला हे रेड कार्ड मिळाल्यामुळे पोलार्डला 10 खेळाडूंसह खेळावे लागले आणि त्याने सुनील नरेनला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
क्रिकेटमध्ये रेड कार्डचा वापर कसा होतो?
क्रिकेट जगतात पहिल्यांदाच सीपीएलमध्ये रेड कार्डचा वापर होत आहे. ‘स्लो ओव्हर रेट’मुळे सीपीएलमध्ये रेड कार्डचा नियम लागू करण्यात आला आहे. मागच्या काही काळात या लीगचे टी-२० सामने नियोजित वेळेच्या पलीकडे जात होते. त्याला लगाम घालण्यासाठी आता रेड कार्डचा वापर केला गेला आहे.
हे ही वाचा : अहमदाबादमध्ये 4 ऑक्टोबर रोजी होणार आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ ची रंगतदार सुरुवात
त्रिनबॅगो नाइट रायडर्सला ‘स्लो ओव्हर रेट’ साठी रेड कार्ड
सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध त्रिनबागो नाईट रायडर्स सामन्यादरम्यान त्रिनबॅगो नाइट रायडर्सला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यावर पंचांनी 19व्या षटकानंतर संघाला रेड कार्ड दाखवले. या स्थितीत कायरॉन पोलार्डने सुनील नरेनला बाहेरचा रस्ता दाखवला आणि संघाने शेवटचे षटक 10 खेळाडूंना टाकले.
ही चूक त्रिनबागो नाईट रायडर्सला महागात पडली कारण ड्वेन ब्राव्होच्या शेवटच्या षटकात सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्सने तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावा जमवताना 178 धावांची मजल मारली.
सीपीएलमध्ये ‘स्लो ओव्हर रेट’ चा नियम काय आहे?
जर संघ 18 व्या षटकाच्या सुरुवातीला आवश्यक ओव्हर रेटने पिछाडीवर असल्याचे आढळले तर, संघाला वर्तुळात ठेवण्यासाठी अतिरिक्त खेळाडू आवश्यक असेल. यानंतर मंडळात एकूण 5 खेळाडू असतील.
जर संघ 19व्या षटकाच्या सुरुवातीला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला, तर त्यांना 30 यार्डच्या वर्तुळात एका ऐवजी दोन अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावे लागतील. अशा स्थितीत एकूण 6 खेळाडू मंडळात राहतील.
दुसरीकडे, 20 व्या षटकाच्या सुरुवातीला संघ निश्चित ओव्हर रेटच्या मागे आढळल्यास, संघाला 6 खेळाडूंना वर्तुळात ठेवावे लागेल आणि कर्णधाराला मैदानाबाहेर क्षेत्ररक्षक दाखवावा लागेल.
सामना झपाट्याने पुढे नेण्याची जबाबदारी फलंदाजी करणाऱ्या संघावरही असेल. जर फलंदाजांमुळे खेळ संथ होत असेल तर पंच प्रथम त्यांना ताकीद देतील, त्यानंतरही वेळ वाया घालवला तर संघाला ५ धावांचा दंडही ठोठावला जाईल.