fbpx

ICC world cup 2023 Opening Ceremony : अहमदाबादमध्ये 4 ऑक्टोबर रोजी होणार आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ ची रंगतदार सुरुवात

ICC world cup 2023 | आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सराव सामने ३ ऑक्टोबरला संपणार आहेत. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, सराव सामना संपल्यानंतर सर्व कर्णधार अहमदाबादमध्ये जमतील. सर्व प्रसारमाध्यमांशी संवाद साधून फोटो काढणार आहेत. हा दिवस ‘कॅप्टन डे’ म्हणून ओळखला जातो.

10 संघांचे कर्णधार उपस्थित राहणार

भारतात ५ ऑक्टोबरपासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी ४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा आयोजित केला जाऊ शकतो. या रंगतदार कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स भाग घेऊ शकतात. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, त्या दिवशी सर्व 10 संघांचे कर्णधारही तेथे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी, स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झालेला संघ न्यूझीलंड यांच्यात होईल.

सराव सामने ३ ऑक्टोबरला संपणार

आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सराव सामने ३ ऑक्टोबरला संपणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सराव सामना संपल्यानंतर सर्व कर्णधार अहमदाबादमध्ये जमतील. सर्व प्रसारमाध्यमांशी संवाद साधून फोटो काढणार आहेत. हा दिवस ‘कॅप्टन डे’ म्हणून ओळखला जातो. यानंतर सायंकाळी सर्व कर्णधार उद्घाटन समारंभात सहभागी होतील. अहमदाबादमध्ये विश्वचषक स्पर्धेचा ​​अंतिम सामनाही 19 नोव्हेंबरला होणार आहे.

हे ही वाचा : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!

समारंभाच्या एक दिवस आधी सहा कर्णधार असतील व्यस्त

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) सदस्य, जागतिक क्रिकेट प्रशासकीय मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी, 10 पैकी सहा कर्णधार खूप व्यस्त असतील. भारताची स्पर्धा नेदरलँडशी होणार आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार असून श्रीलंकेचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. अशा परिस्थितीत या सहा संघांच्या कर्णधारांना सामना संपल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे अहमदाबादला जावे लागेल.

ICC world cup 2023 : भारतातील 10 शहरांमध्ये सामने

विश्वचषक स्पर्धेत एकूण 58 सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये 10 सराव सामन्यांचा समावेश आहे. विश्वचषकाचे सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. अहमदाबाद, हैदराबाद,दिल्ली, चेन्नई, धर्मशाला, लखनौ, बेंगळुरू, मुंबई, पुणे, आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त हैदराबाद येथे सराव सामने होणार आहेत.

श्रीलंका आणि नेदरलँडला क्वालिफायरमधून प्रवेश

या विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता म्हणून या स्पर्धेत पोहोचले आहेत. या दोघांशिवाय यजमान भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ विश्वचषकात दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *