Super Crispy Rava Shankarpali: रव्याची खुसखुशीत शंकरपाळी

Rava Shankarpali

ठळक मुद्दे

Rava Shankarpali: शंकरपाळी बनवितांना आपण मैद्याऐवजी रवा वापरु शकतो. मैद्याची शंकरपाळी जितकी खुसखुशीत होतात तितकीच रव्याची शंकरपाळीही खुसखुशीत होतात. यासाठी पदार्थांचे प्रमाण काय घ्यायचे, ती करायची कशी हे समजून घेणे आवश्यक असते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला मैद्याचा वापर न करता सगळ्यांना खाता येतील आणि चविष्ट होतील अशी रव्याची शंकरपाळी कशी करायची ते पाहूया…

Rava Shankarpali: साहित्य

  • रवा – १.५ वाटी
  • तूप – अर्धी वाटी
  • पिठीसाखर – पाऊण वाटी
  • दूध – पाव वाटी
  • मैदा – पाव वाटी
  • तेल – तळण्यासाठी २ ते ३ वाट्या

Rava Shankarpali: कृती

  • रवा चाळून मिक्सरमधून बारीक करुन घ्या, त्यामुळे त्याचे पीठ होते आणि शंकरपाळ्यासाठी ते अतिशय चांगले एकजीव मळता येते.
  • बारीक केलेल्या या रव्यात तूप पातळ करुन घालावे. त्यानंतर ते थोडे हलवून त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कमी-अधिक पिठीसाखर घालावी.
  • आपण जरी रव्याची शंकरपाळी (Rava Shankarpali) करत असलो तरी पीठ एकजीव मळले जाण्यासाठी त्यात थोडासा मैदा घालावा.
  • हे पीठ मळताना आपण पाण्याचा वापर करत नाही, त्यामुळे हे पीठ दूधात मळावे. पीठ मळताना आवश्यकतेनुसार थोडेथोडे दूध घालून पीठ मळावे.
  • पीठ चांगले मळून झाल्यानंतर त्याचे गोळे करुन पोळपाटावर पोळ्या लाटून घ्याव्यात.
  • आपल्याला आवडतील तशा लहान-मोठ्या आकाराची थोडी जाडसर शंकरपाळी लाटावीत.
  • ही शंकरपाळी तेलात लालसर रंगावर तळावीत, अतिशय खुशखुशीत होतात.