Mere Sapno Ki Rani song Story: किस्सा ‘मेरे सपनो की रानी’ चा
Mere Sapno Ki Rani song Story | किस्सा ‘मेरे सपनो की रानी’ चा: राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर हे त्यांच्या काळातील हिट जोडी होती ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि एकामागून एक हिट चित्रपट दिले. त्यांच्या हिट चित्रपटांपैकी एक ‘आराधना’ हा चित्रपट होता जो हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आइकॉनिक चित्रपट आहे. 1969 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. पडद्यावर आलेल्या चित्रपटाची कथा आणि त्यातले कलाकार या बद्दल सर्वांनाच माहीती आहे, पण पडद्यामागे घडलेल्या अनेक कहाण्या पडद्याआडच दडून राहातात. या चित्रपटातील ‘मेरे सपनो की रानी’ या किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्याशी संबंधित एक मनोरंजक किस्सा आहे ज्या बद्दल फार थोड्या जणांना माहिती असेल. काय होता तो किस्सा? या लेखातून आज आपण जाणून घेणार आहोत.
शर्मिला टागोरशिवाय चित्रीत झाले आहे हे गाणे
‘मेरे सपनो की रानी’ या गाण्याबद्दल सांगायचे झाले तर, या गाण्यात राजेश खन्ना अभिनेता सुजीत कुमार सोबत जीपमध्ये तर शर्मिला टागोर ट्रेनमध्ये दिसत आहेत पण प्रत्यक्षात मात्र हे गाणे शर्मिला टागोर शिवाय चित्रीत झाले होते. होय… या गाण्यात शर्मिला टागोर दिसत असल्या तरी प्रत्यक्षात राजेश खन्ना आणि सुजीत कुमार यांनी हे गाणे दार्जिलिंगमध्ये शूट केले होते, तर शर्मिला टागोर यांनी मुंबईतील एका स्टुडिओमध्ये चित्रीकरणातील त्यांचा काही भाग पूर्ण केला होता. यामागे एक कारण होते.
हे ही वाचा : ‘वेलकम 3’ ची स्टारकास्ट झाली आणखीनच रंजक, चित्रपटात दिसणार आहेत या दोन सुंदरी
शर्मिला टागोरला आला होता राग
वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, जेव्हा ‘आराधना’चं चित्रीकरण सुरु होतं त्या वेळी शर्मिला प्रस्थापित कलाकार होती त्यामुळे तिच्याकडे अनेक चित्रपट होते. त्यामुळे ज्यावेळी या गाण्याचं चित्रीकरण करायचं होतं त्यावेळी शर्मिला टागोर त्या वेळी इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होत्या आणि त्याच वेळी ‘आराधना’चं हे गाणं शूट करायचं होतं, त्यामुळे इच्छा असूनही ती दार्जिलिंगला येऊ शकली नाही. या गाण्याचे चित्रीकरण पुढे ढकलले असते तर राजेश खन्ना यांना तारखा मिळू शकल्या नसत्या. अशा परिस्थितीत वेगवेगळे शूट करण्याचा निर्णय दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी घेतला आणि राजेश खन्ना आणि सुजित कुमार यांनी या गाण्यातील त्यांच्या भागाचे चित्रीकरण दार्जिलिंगमध्ये शर्मिला यांच्याशिवाय पूर्ण केले. पुढे मुंबईत एका स्टुडिओत ट्रेनचा सेट लावून शर्मिला यांचे सीन्स चित्रित कारणात आले. आपले सीन्स खऱ्या लोकेशनवर शूट झाले नाहीत म्हणून शर्मिला टागोर यांना थोडा राग आला होता पण तरी त्यावेळी ते आवश्यकही होते.
ब्लॉकबस्टर हिट ठरला होता हा चित्रपट
राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचा ‘आराधना’ हा चित्रपट खूप गाजला. अवघ्या 80 लाख रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अनेक पटींनी कमाई करून रेकॉर्ड तोडले.