fbpx

Welcome 3: ‘वेलकम 3’ ची स्टारकास्ट झाली आणखीनच रंजक, चित्रपटात दिसणार आहेत या दोन सुंदरी

Welcome 3

Welcome 3 : अक्षय कुमारचा ‘वेलकम ३’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटाची स्टारकास्ट दिवसेंदिवस रंजक होत आहे. अर्शद वारसी आणि संजय दत्त यांच्यानंतर या चित्रपटात दोन नव्या अभिनेत्रींचा प्रवेश झाला आहे. एका एंटरटेनमेंट वेबसाईटने चित्रपटातील कलाकारांबाबत मोठा दावा केला आहे.

Welcome 3 ची स्टारकास्ट

या कॉमेडी एंटरटेनरसाठी जॅकलीन फर्नांडिस आणि दिशा पटानी यांची निवड करण्यात आली आहे, असे वृत्त पिंकविलाने दिले आहे. अक्षय कुमार या चित्रपटात त्याची भूमिका पुन्हा साकारताना दिसणार आहे. तर संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी ‘वेलकम 3’ मध्ये अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांची जागा घेतली आहे.

अहमद खान यांचे दिग्दर्शन

‘वेलकम’ या फ्रँचायझीचे पहिले दोन भाग अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केले होते. त्याचवेळी अहमद खान यांच्या दिग्दर्शनाखाली तिसरा चित्रपट बनणार आहे. दिग्दर्शक ‘बागी 2’ आणि ‘बागी 3’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते लवकरच याबद्दल अधिकृत निवेदन जारी करतील आणि स्टारकास्टबद्दल माहिती देतील.

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार,, गेल्या आठवड्यात अक्षय कुमार, संजय दत्त, अर्शद वारसी, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडीज, फिरोज नाडियादवाला आणि अहमद खान वेलकम 3 च्या फोटोशूटसाठी भेटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या घोषणेसोबतच पिक्चरचा हा फोटोही प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा : रजनीकांतचा सिनेमा रिलीज होणार म्हणून कार्यालयांना सुट्टी

तिसर्‍या भागासाठी प्रेक्षक आतुर

अनीस बज्मी दिग्दर्शित ‘वेलकम’ 2007 मध्ये रिलीज झाला होता. यात फिरोज खान, अनिल कपूर, नाना पाटेकर, अक्षय कुमार, कतरिना कैफ, परेश रावल आणि मल्लिका शेरावत यांनी भूमिका केल्या होत्या. तर, 2015 मध्ये ‘वेलकम बॅक’चा सिक्वेल रिलीज झाला होता, ज्यामध्ये अनिल कपूर, नाना पाटेकर, जॉन अब्राहम, श्रुती हासन, शायनी आहुजा, अंकिता श्रीवास्तव, डिंपल कपाडिया, परेश रावल आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका होत्या. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. या चित्रपटातील दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. यामुळेच आता लोक तिसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.