fbpx

IND vs AUS: T20 मालिकेत कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केले? आशिष नेहराने घेतले या युवा फलंदाजाचे नाव

Rinku Singh

IND vs AUS:ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत रिंकू सिंगने आशिष नेहराला सर्वाधिक प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रिंकू सिंगची बॅट जोरदार बोलली. रिंकूने पाच सामन्यांमध्ये 175 च्या अतुलनीय स्ट्राइक रेटने 105 धावा केल्या. पहिल्या T20 मध्ये रिंकूने दमदार खेळी करत भारताला 2 गडी राखून विजय मिळवून दिला.

भारतीय संघाची दमदार कामगिरी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाची कामगिरी दमदार होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली. या मालिकेत रुतुराजपासून ते रवी बिश्नोईपर्यंत अनेक तरुण खेळाडूंनी आपल्या दमदार खेळीने धुमाकूळ घातला. मात्र, वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, रिंकू सिंगच्या झंझावाती फलंदाजीने आशिष नेहराला सर्वाधिक प्रभावित केले.

हे ही वाचा : IPL 2024 लिलाव: तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे जाहीर, पहिल्यांदाच भारताबाहेर होणार लिलाव

रिंकूने सर्वाधिक प्रभावित केले

जिओ सिनेमावर बोलताना आशिष नेहरा म्हणाला, “प्रत्येकाने दमदार परफॉर्मन्स दिला, एक नाव निवडणे खूप कठीण आहे. मात्र, माझ्या मते, रिंकू सिंगने ज्या प्रकारची खेळी खेळली त्यामुळे त्याने सर्वात जास्त प्रभावित केले, विशेषत: चौथ्या टी-20 सामन्यांमध्ये. रिंकू लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी ओळखला जातो. 15व्या किंवा 16व्या षटकात जिंकण्यासाठी 50 – 60 धावा आवश्यक असताना तो फलंदाजीला येतो. फिनिशर म्हणून रिंकू नेहमीच प्रभावी ठरला आहे पण चौथ्या सामन्यात त्याला वेगळी भूमिका बजावायची होती आणि त्याने ती भूमिका चोख बजावली.”

माजी भारतीय गोलंदाज पुढे म्हणाला, “खेळपट्टी सपाट होती किंवा परिस्थिती सोपी होती असे तुम्ही कितीही म्हणालात, तरी असे काहीही नव्हते. एका टोकाकडून सतत विकेट्स पडत होत्या, पण दुसऱ्या बाजूने रिंकू खंबीरपणे उभा राहिला आणि जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा त्याने आक्रमक फटके खेळले. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याची निवड होण्यामागे काहीतरी कारण असेलच ना.”

रिंकूच्या बॅटने ओकली आग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रिंकू सिंगची बॅट जोरदार बोलली. रिंकूने पाच सामन्यांमध्ये 175 च्या अतुलनीय स्ट्राइक रेटने 105 धावा केल्या. पहिल्या T-20 मध्ये रिंकूने 22 धावांची दमदार इनिंग खेळली आणि भारताला 2 गडी राखून विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या टी-20मध्ये रिंकूने केवळ 9 चेंडूत 31 धावा केल्या. चौथ्या T20 सामन्यात भारतीय फलंदाजाने 29 चेंडूत 46 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.