fbpx

Dr. V N Bedekar Vyakhyanmala 2023 | डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमाला

Bedekar Vyakhyanmala 2023

Bedekar Vyakhyanmala 2023 | बेडेकर व्याख्यानमाला 2023:

‘संस्कृत’मुळेच भारताबाहेर भारतीय संस्कृतीचे अस्तित्व, डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेत ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर यांचे प्रतिपादन

ठाण्याच्या विद्याप्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या ‘पाणिनी’ सभागृहात डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्या व्याखयानाने झाली.

संस्कृत भाषेमुळेच भारताबाहेरही भारतीय संस्कृतीचे अस्तित्व

संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा असून संस्कृत भाषेमुळेच भारताबाहेरही भारतीय संस्कृतीचे अस्तित्व टिकुन आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी केले. ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील पाणिनी सभागृहात डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना डॉ. बहुलकर यांनी ‘देशोदेशीच्या संस्कृत भाषा’ उलगडल्या. याप्रसंगी व्यासपीठावर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, सौ.सुमेधा बेडेकर, उपप्राचार्य महेश पाटील, डॉ. विमुक्ता राजे,प्रा.इशिता प्रधान प्रा.मानसी जंगम, प्रा.रूपेश महाडिक, प्रा.राजश्री माने आदी उपस्थित होते.

संस्कृत ही सर्वात प्राचीन, समृद्ध भाषा

डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी पुढे बोलताना, संस्कृत ही सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ हा संस्कृत भाषेत आहे. जैन धर्माची पाली भाषा आणि बौदध धर्माची प्राकृत भाषा असली तरी हिंदुसह या धर्मांच्या उपासनेची भाषा संस्कृत आहे. १४ विद्या आणि ६४ कला आता संस्कृतमध्ये उपलब्ध नसल्या तरी यातील अनेक शास्त्रांचे संदर्भ संस्कृतमध्येच मिळतात. संस्कृत भाषेतील प्राचिन कोष हा जगामधील असा कोष आहे ज्यात संस्कृतमधील सर्व शब्द आलेले असल्याचे डॉ. बहुलकर यांनी केले. धर्माच्या अंगाने संस्कृत भाषेचा प्रसार झाला आहे असेही डॉ. बहुलकर यांनी सांगितले.

ज्ञानाचे अदान – प्रदान संस्कृत मध्ये

संस्कृत भाषेत अनेक सुभाषिते आहेत. पूर्वी ज्ञानाचे अदान – प्रदान संस्कृत मध्ये होत असे किंबहुना प्राचीन काळी वाद विवाद (डिबेट) देखील संस्कृतमध्ये होत असत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात, विशेष म्हणजे वाक्यातील शब्द मागे पुढे जरी झाले तरी त्याचा अर्थ बदलत नाही. इंग्रजी फ्रेंच भाषेतील अनेक शब्द संस्कृतचा अपभ्रंश आहेत.

संस्कृत ही भारतीयांच्या अभिमानाची बाब

प्राचीन काळानंतर आधुनिक काळातील संस्कृतमधील सुंदर शैली विषद करताना डॉ. बहुलकर यांनी साऱ्यांचे लक्ष संस्कृतकडेच असल्याचे सांगितले. परदेशी विद्यापीठात संस्कृतच्या अभ्यासक्रमात योग आणि आयुर्वेद यांचा अभ्यास सर्वाधिक चालतो. संस्कृत विद्या ही भारतीयांच्या अभिमानाची बाब आहे, भारतीय संस्कृती भारताबाहेर दिसते ती संस्कृत भाषेमुळेच असे नमुद करून इंडोनेशिया, तिबेट, थायलंड आदी अनेक देशामध्ये आजही संस्कृत भाषेचा वापर दिसुन येतो असेही ते म्हणाले. या व्याख्यांनानंतर उपस्थित श्रोते व विद्यार्थ्याच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसनही डॉ. बहुलकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अंकुर काणे यांनी केले.