fbpx

तृप्ती मोकाशी कोलाबकर: ड्रीम प्लॅनेटचे ‘स्वप्न’ साकारणारी यशस्वी उद्योजिका

तृप्ती मोकाशी कोलाबकर

ठाणे शहरातील कोलबाड परिसरात तुम्ही एखादा पत्ता शोधत असाल किंवा एखाद्याला सांगत असाल तर लँडमार्क म्हणून तुम्ही ‘ड्रीम प्लॅनेट’चा उल्लेख नक्की करालच. कोलबाड मध्ये आलात आणि ड्रीम प्लॅनेट दिसले नाही असं क्वचितच घडेल. ड्रीम प्लॅनेट नर्सरी आणि प्रीस्कूल ही या भागातली नावाजलेली संस्था. या संस्थेचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक डोलारा मागची सोळा वर्षे एकहाती सांभाळणाऱ्या सौ.तृप्ती मोकाशी कोलाबकर या आजच्या पिढीतील यशस्वी उद्योजिकांचं नाही तर एक उत्तम युवा नेतृत्वही आहेत.

प्रेरणादायी प्रवास

आज नावारूपाला आलेल्या ड्रीम प्लॅनेट या आपल्या संस्थेसाठी तृप्ती यांनी अपार कष्ट घेतले आहेत प्रचार केला आहे. सुरवातीला सगळंच एक हाती सांभाळतांना तृप्ती यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ‘झी नेटवर्क’, ‘युरोकिड्स’ सारख्या मोठ्या कॉर्पोरेट संस्थांबरोबर प्री स्कुल बिजनेस मध्ये स्पर्धा करीत असतांना पाय रोवून उभे राहणे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे अवघड होते पण तृप्ती यांना त्यांच्या ध्येयाने झपाटले होते. ही संस्था त्यांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द त्यांच्यात होती आणि म्हणूनच ही संस्था उदयाला आली आणि काही काळातच नांवारूपालाही आली. त्यांची ही कहाणी कुठल्याही महिला उद्योजकासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

आपल्या कामावर आपली निष्ठा असेल तर शून्यातून विश्व निर्मिती करता येते म्हणतात. याचीच प्रचिती तृप्ती मॅडम यांचा कार्य आवाका बघताना येते. आज नावारूपाला आलेल्या ड्रीम प्लॅनेट या आपल्या संस्थेसाठी तृप्ती यांनी अपार कष्ट घेतले आहेत. आपल्या संस्थेच्या सुरुवातीच्या काळात स्वतः सार्वजनिक बाल क्रीडा विभागात जाऊन प्रचार केला आहे. अनेक शाळांच्या बाहेर उभे राहून, आसपासच्या गृहसंकुलात जाऊन सौ तृप्ती यांनी आपली जाहिरात पत्रक वाटली जेणेकरून सर्वांना त्याची माहिती होईल. आणि आता म्हणजे कोरोना काळ धरून दहा हजार पेक्षा जास्त बाळ गोपाळ विद्यार्थी त्यांच्या संस्थेत शिकून आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करून गेले आहेत.

https://vandemaharashtra.com/shubhangi-kir-youtuber/

सुरूवात

ठाण्यातील सरस्वती एजुकेशन सोसायटी शाळेत शालेय शिक्षण घेऊन मग त्या नंतर जोशी बेडेकर कॉलेजमध्ये सौ तृप्ती यांनी पदवी प्राप्त केली. शिक्षणा दरम्यानच अनेक उन्हाळी शिबिरात त्या सहाय्यक म्हणून काम बघायच्या आणि तेव्हा पासूनच त्या बाल विश्वात रमु लागल्या. म्हणूनच पदवी प्राप्त करून त्यांनी अर्ली चाईल्ड हुड एज्युकेशन कोर्स पूर्ण केला आणि आईवडिलांच्या सहकार्याने तृप्ती यांनी 2006 मध्ये प्री स्कूल अक्टिविटी सेंटर सुरू केले.

ॲक्टिविटी सेंटर

प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर आणि सिनियर केजी तसेच विविध छंद वर्ग या संस्थेत घेतले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल वेळोवेळी अभिप्राय, सूचना दिल्या जातात. आईवडिलांच्या कुशीतून पहिल्यांदा जग बघणारी चिमुकली मुले संस्थेत पहिल्याच दिवशी आल्यावर रमून जातात. मुलांना आकर्षित करणारे संस्थेचे इंटेरियर,विविध उच्च प्रतीची खेळणी, शैक्षणीक साधने आणि विद्यार्थ्यांना घरच्या सारखे प्रेम देत शिकवणाऱ्या सर्व शिक्षिका आणि सर्व सहकारी स्टाफ हे तृप्ती मॅडम यांच्या ड्रीम प्लॅनेट ॲक्टिविटी सेंटर चे वैशिष्ट्य आहे. आपल्या संस्थेतील सर्व वर्गात आणि सत्रात संस्थांपिका तृप्ती मॅडम स्वतः जातीने लक्ष देऊन उत्तम व्यवस्थापन करतात.

2006 सालच्या स्थापने पासून आतापर्यंतच्या काळात सातत्याने वटवृक्षासारख्या फोफावलेल्या या संस्थेची आता पर्यंतची विद्यार्थी एकूण संख्या आता दहा हजार पेक्षा जास्त आहे.

सामाजिक बांधिलकी

सामाजिक जाणिवा जागृत ठेवून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध वर्ग त्यांनी चालू केले. या सर्व शैक्षणिक आणि सांस्कृतिक वर्गांसाठी त्यांनी गरजू व आर्थिक दृष्ट्या सबळ नसलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सवलत आपल्या संस्थेत त्या दरवर्षी देत असतात. आपल्या या कार्यामुळेच सर्वदूर ओळख पसरलेल्या तृप्ती मॅडम यांना विविध आंतर शालेय स्पर्धांना परीक्षक म्हणून त्यांना निमंत्रित केले जाते.

फक्त व्यावहारिक दृष्टिकोन न बाळगता सामाजिक बांधिलकी जपणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. याचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून त्या निदर्शनास आणत असतात.

नैसर्गिक आपत्ती असो वा सामाजिक अथवा वैद्यकीय, प्रत्येक वेळी सामाजिक बांधिलकी जपत गरजवंताना त्या फुल ना फुलाची पाकळी आवर्जून मदत करत असतात.

आपल्या या सामाजिक उपक्रमाचे श्रेय मी माझ्या वडिलांना देते असे म्हणताना , ” आई वडिलांकडूनच मला समाज कार्याची प्रेरणा मिळाली, गरजूंना मदत करण्याची आस्था मिळाली “,असे त्या आवर्जून सांगतात.

‘ महिला सशक्तीकरण करणे ‘ हा देखील सौ तृप्ती यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कोलबाड परिसरातील महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून मागील काही वर्षे त्या काम पाहत आहेत. परिसरातील महिला आणि लहान मुलांसाठी आपल्या संस्थेतर्फे त्या अनेक उपक्रम राबवत असतात.तसेच विविध सामाजिक आश्रमाना भेटी देऊन गरजू वस्तूंचे वाटप करतात.

सौ तृप्ती मोकाशी – कोलाबकर यांचे कार्य फक्त इथेच मर्यादित राहत नाही तर मुक्या प्राण्यांना देखील त्या तितकेच जपतात. परिसरातील कोणत्याही प्राण्याला दुखापत झाली किंवा काही आजारपण आले तर परिसरातील रहिवासी त्यांना हक्काने बोलवतात, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या म्हणजेच श्री संदेश यांच्या मदतीने त्या मुक्या जीवाला दवाखान्यात घेऊन जाऊन पुढील उपचार करतात.

खंबीर पुरुषाचा पाठिंबा

एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका खंबीर स्त्रीचा पाठिंबा असतो असे म्हणतात. त्याच धर्तीवर आजच्या या आधुनिक काळात घर – संसार – मातृत्व – व्यवसाय – समाज कार्य या सर्व आघाड्यांवर धडाडीने आपले कर्तृत्व गाजवत असलेल्या स्त्रीच्या मागे समंजस आणि खंबीर पुरुषाचा पाठिंबा असतो हे मान्य करायलाच हवे. आपल्या यशाचे श्रेय देताना त्या म्हणतात की , ” लग्नाआधी मला माझ्या वडिलांची साथ होती म्हणून मी आत्मविश्वासाने ड्रीम प्लॅनेट ही माझी स्वप्नात पाहिलेली संस्था सत्यात साकार करू शकले. हीच साथ, हाच दिलासा आणि पाठिंबा मला लग्नानंतर माझे पती श्री जयेंद्र कोलाबकर तसेच माझे आदरणीय सासू सासरे यांनी दिला”.

कौटुंबिक सख्य, सामाजिक बांधिलकी जपत असतानाच एक उत्कृष्ट खंबीर यशस्वी व्यावसायिक महिला अशा अनेक स्तरावर निःपक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणे मार्गक्रमण करत असलेल्या सौ तृप्ती मोकाशी – कोलाबकर यांना ड्रीम प्लॅनेट ॲक्टीविटी सेंटरचा हा वटवृक्ष असाच बहरत ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!