fbpx

केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी ६ टिप्स

How to preserve Banana

सहज उपलब्ध होणारे आरोग्यदायी फळ

केळी हे बारा महिने सहज उपलब्ध होणारे, स्वस्त आणि आरोग्यदायी फळ आहे. त्यामुळे बहुतांश घरात सकाळच्या नाश्त्यात केळ्यांचा समावेश असतो. उभ्या उभ्या सहज खाता येईल असे हे फळ असल्यामुळे दिवसभरात कधीही खाल्ले जाते. लहान मुलांचे तर हे आवडते फळ असते.

केळी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केळं हे उत्तम फळ आहे. केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर उपलब्ध असते. त्यामुळे केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

केळी जास्त दिवस कशी टिकवायची?

आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असल्याने प्रत्येक घरात केळी आणली जातातच. सर्वांनाच आवडणारे फळ असल्याने बऱ्याचदा केळी नेहमी जास्त प्रमाणातच आणली जातात. पण केळी फार दिवस टिकत नाहीत. पिकलेली केळी तर अगदी एक-दोन दिवसांमध्येच खराब होतात. त्यामुळे केळी जास्त दिवस कशी टिकवायची हा प्रश्न सर्व गृहिणींसमोर असतो. ६ सोप्या पद्धती वापरून तुम्ही केळी जास्त दिवस टिकवू शकता.

६ टिप्स

  • बाजारातून केळी घरी आणल्यानंतर त्यांच्या देठावर प्लास्टिक किंवा कागद गुंडाळुन ठेवा. यामुळे केळी जास्त दिवस टिकतील.
  • केळी ठेवण्यासाठी विशेष हँगर उपलब्ध असतात. केळी त्यात ठेवल्यास लवकर खराब होणार नाहीत.
  • ‘व्हिटॅमिन सी’ची गोळी केळी टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ची गोळी पाण्यात मिसळा आणि त्या पाण्यात केळी ठेवा. यामुळे केळी लवकर खराब होणार नाहीत.
  • केळी कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नये. केळ्यांना नेहमी रूम टेम्परेचर ठेवावे.
  • बेकिंग सोडादेखील केळी टिकवून ठेवण्यात मदत करतो. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि या पाण्यात केळी ठेवा. नंतर थोड्या वेळाने केळी पाण्यातून बाहेर काढून सामान्य तापमानाला ठेवा. यामुळे केळी लवकर खराब होणार नाहीत.
  • आंबट फळांमध्ये सायट्रिक एसिड असते. आंबट फळांच्या रसामध्ये केळी साठवल्यास, केळी लवकर खराब होणार नाहीत तसेच ती काळीदेखील पडत नाहीत.