fbpx

गणपती बाप्पाचे आगमन

गणपती बाप्पाचे आगमन

कवी: प्रमोद न सूर्यवंशी, मालाड

शंकर पार्वतीचा नटखट बाळ
खातोय गोड गोड सदा मोदक
गणेश कार्तिक गौरी भाऊ बहीण
उंदरी मामा सोबत मैत्रीचा दैवक … १

वाजत गाजत ही माझ्या घरात
गणपती बाप्पाचे आगमन झाले
घरात दारात उत्साह हो नांदला
सर्वांच्या मनाला उधाण खर आले … २

आहे तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
दूर कर जगावरच्या या विग्नाला
तुझी पूजा आरती करतो नेहमी
तुच संभाळू शकतो मानवाला … ३

तुझी महिमा कशी हो वर्णनावी
खरोखरच खूप खूप आहे मोठी
आमच्या सगळ्यांचा तूच आधार
तुझे नाव यावे सदा आमच्या ओठी ….. ४

अष्टविनायक रूपे ही गणेशाची
अगण्य असा बुद्धीचा माझा देव
रिद्धी सिद्धी सोबत संसार थाटला
युगात मनात राही हेच मला ठाव …. ५

    कवी: प्रमोद न सूर्यवंशी
    मालाड, मुंबई