fbpx

Women’s IPL Teams Finalised: महिला आयपीएल संघांची घोषणा

Women’s IPL Teams Finalised: बहुप्रतिक्षित असेलल्या भारतातील पहिल्या महिला आयपीएल संघांचा लिलाव मुंबईत पार पडला. यावेळी बीसीसीआयने नवीन पाच फ्रेंचायझीची घोषणा (Women’s IPL Teams Finalised) केली. या लिलावात पाच संघ खरेदी करण्यासाठी एकूण १७ कंपन्यांनी बोली लावली होती. दरम्यान, यावेळी पुरुषांच्या पहिल्या आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेटसाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

महिला आयपीएल स्पर्धेत मुंबई, दिल्ली, लखनौ, बंगळुरू आणि अहमदाबाद हे पाच संघ असणार आहेत. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Women’s IPL Teams Finalised: या कंपन्यांचा लिलावात होता सहभाग

सुरुवातीला, ३३ कंपन्यांनी महिला आयपीएलमध्ये फ्रँचायझी खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले होते आणि निविदा कागदपत्रे खरेदी केली होती. मात्र, यापैकी केवळ १७ पक्षांनी तांत्रिक बोलीसाठी आपली कागदपत्रे सादर केली. यामध्ये सात आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांचा समावेश होता. यापैकी फक्त तिघांनाच महिला आयपीएल फ्रँचायझी मिळाली. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मालकांनी महिला आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे. यापैकी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूच्या मालकांना संघ खरेदी करण्यात यश आले.

Women’s IPL Teams Finalised: कुणाला मिळाला कुठला संघ?

अदानी स्पोर्ट्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1289 कोटी रुपये खर्चून अहमदाबाद संघाची मालकी मिळवली. मुंबई संघाचं मालकत्व इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असणार आहे. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेतील मुंबई संघाची मालकी याच कंपनीकडे आहे.

बंगळुरुस्थित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएलमधील पुरुष संघांच्या फ्रँचाइज कंपनीनेच महिला संघासाठी आवेदन जिंकलं. त्यांनी या संघासाठी 901 कोटी रुपये खर्च केले.

दिल्ली संघांची मालकी जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असणार आहे. 810 कोटी रुपयांच्या आवेदनासह त्यांनी संघाचं मालकत्व मिळवलं. लखनौ संघ काप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडकडे असणार आहे. 757 कोटी रुपये खर्चून त्यांनी हक्क मिळवले.

पाच संघांची मिळून एकत्रित मूल्यांकन 4669.99 कोटी रुपये असणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. पाच संघांत खेळाडू कोण असणार यासाठी लवकरच खेळाडूंचा लिलाव होणार आहे. तूर्तास लिलावाची तारीख जाहीर झालेली नाही.

चेन्नई सुपर किंग्स संघाने महिला आयपीएल संघासाठी दावेदारी अगदी आयत्या वेळेला मागे घेतली. 5 संघ खरेदी करण्यासाठी 17 विविध कंपन्या शर्यतीत होत्या. Viacom18 कंपनीने महिला आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क मिळवले आहेत. पाच वर्षांसाठी ही कंपनी बीसीसीआयला 951 कोटी रुपये देणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी साधारण 7.09 कोटी रुपये ही कंपनी बीसीसीआयला देईल.

हे ही वाचा: WPL चे वेळापत्रक

‘वूमन्स प्रीमिअर लीग’ची सुरवात

स्पर्धेचे स्वरूप

सर्व फ्रँचाईज मालकांना खेळाडू खरेदी करण्यासाठी एकूण 12 कोटी रुपये मिळणार आहेत. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघासाठी आयकॉन प्लेयर अशी व्यवस्था होती. महिलांच्या आयपीएल स्पर्धेत आयकॉन प्लेयर असणार नाही.

पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेत अंतिम अकरात केवळ चारच विदेशी खेळाडू खेळू शकत असत. महिला आयपीएल स्पर्धेत अंतिम अकरात पाच विदेशी खेळाडू खेळू शकतात. या पाचपैकी एक खेळाडू असोसिएट देशांपैकी एक असणं अनिवार्य आहे.

विजेत्या संघाला 6 कोटी रुपये बक्षीसाने गौरवण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला 3 कोटी तर तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला 1 कोटी रुपये मिळतील.

अशी आहेत महिला संघांची नावे:

दिल्ली कॅपिटल्स वूमन्स
गुजरात जायन्ट्स
मुंबई इंडियन्स वूमन्स
रॉयल चॅलेंजर बेंगलोर वूमन्स
यु पी वॉरीयर्स

कोठे रंगणार आहेत हे सामने?

वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचे सगळे सामने मुंबईत होणार आहेत. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियम आणि नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम येथे या सामन्यांचा थरार रंगणार आहे.

वूमन्स ट्वेन्टी20 चॅलेंजद्वारे रंगीत तालीम

वूमन्स आयपीएल स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून बीसीसीआयने 4 वर्ष वूमन्स ट्वेन्टी20 चॅलेंज स्पर्धा आयोजित केली होती. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान महिलांच्या ट्वेन्टी20 मॅचेसही खेळवण्यात आल्या होत्या. ट्रेलब्लेझर्स, सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी अशी संघांची नावं होती. या तीन संघांमध्ये प्रामुख्याने भारतीय खेळाडू होत्या. त्यांच्या बरोबरीने इतर संघातील अव्वल खेळाडूंनाही संघात समाविष्ट करण्यात आलं होतं.

2018 आणि 2019 मध्ये सुपरनोव्हा संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. 2020 मध्ये ट्रेलब्लेझर्स संघाने तर 2022 मध्ये सुपरनोव्हाने जेतेपद मिळवले होते. 2021 मध्ये कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही.