fbpx

Harley-Davidson X440 बाईकला प्रचंड प्रतिसाद

Harley-Davidson X440

Harley-Davidson X440 :​ भारतातील सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक हिरो मोटोकॉर्पच्या Harley-Davidson X440 ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. Harley-Davidson X440 भारतीय बाजारात 3 जुलै रोजी 2.29 लाख रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत लॉन्च करण्यात आली.

Harley-Davidson X440 ला प्रचंड प्रतिसाद

भारतातील सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक हिरो मोटोकॉर्पच्या Harley-Davidson X440 ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. Harley-Davidson X440 भारतीय बाजारात 3 जुलै रोजी 2.29 लाख रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत लॉन्च करण्यात आली. नंतर नवीन किंमत जाहीर करण्यात आली. लॉन्चसोबतच बाईकचे अधिकृत बुकिंगही सुरू झाले. ही बाईक तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली असून ग्राहकांचाही उदंड प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

बुकिंग विंडो आता झाली बंद

हिरो मोटोकॉर्पला आतापर्यंत Harley-Davidson X440 साठी 25,597 बुकिंग मिळाले आहेत. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, 4 जुलै रोजी उघडलेली बुकिंग विंडो आता बंद झाली आहे. कंपनीने 8 ऑगस्ट रोजी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीन विंडो लवकरच जाहीर केली जाईल. हिरो मोटोकॉर्प कंपनी सप्टेंबरमध्ये आपल्या नीमराना, राजस्थान येथील गार्डन कारखान्यात Harley-Davidson X440 चे उत्पादन सुरू करेल आणि ऑक्टोबरपासून ग्राहकांना वितरण सुरू करेल.

ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरु

हार्ले डेविडसन X440 मॉडेलची डिलिव्हरी ऑक्टोबर 2023 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत, कंपनी आपल्या ग्राहकांना हार्ले डेव्हिडसन X440 मॉडेलची टेस्टींग सुरू करेल. हार्ले डेव्हिडसन X440 मॉडेलचे तीन व्हेरिएंट, डेनिम, विविड आणि एस बाजारात दाखल झाले आहेत. ज्याची एक्स-शोरूम किंमत 2.39 लाख, 2.59 लाख आणि 2.79 लाख रुपये आहे.

हे ही वाचा : मुंबईकरांचा प्रवास लवकरच भुयारी मेट्रोतून…

इंजिनमध्ये किती पॉवर?

हार्ले डेविडसन X440 मॉडेलच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात सुमारे 440 सीसीचे एअर ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 27 Bhp पॉवर आणि 38 Nm कमाल टॉर्क निर्माण करते. इंजिनमध्ये 6 स्पीड गियर बॉक्स जोडण्यात आला आहे. यात शास्त्रीय प्रकारची टीयरड्रॉप इंधन टाकी आहे.

सुधारित किमती

डेनिम, विविड आणि एस प्रकारांच्या सुधारित किमती अनुक्रमे 2,39,500 रुपये, 2,59,500 रुपये आणि 2,79,500 रुपये असतील. Hero MotoCorp चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निरंजन गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही हार्ले-डेव्हिडसन X440 लाँच केली आहे, या बाईकची किंमत 2.29 लाख रुपये आहे. आता आम्ही नवीन किंमत जाहीर करत आहोत, जी ऑनलाइन बुकिंगच्या पुढील विंडोसाठी लागू होईल. परिचयात्मक किंमतीसह सध्याची ऑनलाइन बुकिंग विंडो 3 ऑगस्ट रोजी बंद होईल.

भागीदारीत दोन्ही कंपन्यांचे पहिले प्रोडक्शन

अमेरिकन दिग्गज कंपनी हार्ले डेविडसन आणि भारतातील हिरो मोटोकॉर्प यांनी मिळून त्यांचे पहिले मॉडेल हार्ले डेविडसन X440 भारतात लाँच केले आहे. ज्याची तयारी ऑक्टोबर 2020 मध्ये केली होती. म्हणजेच कंपनीने आपले एक प्रोडक्शन 3 वर्षात बाजारात आणले आहे. जे कौतुकास्पद आहे.

टॉप व्हेरियंटसाठी सर्वाधिक बुकिंग

तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची असेल, तर बुकिंग विंडो उघडेपर्यंत वाट पाहावी लागेल किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधू शकता. हिरो मोटोकॉर्पचे म्हणणे आहे की टॉप व्हेरियंटसाठी सर्वाधिक बुकिंग करण्यात आले आहे. ज्याची किंमत 2 लाख 69 हजार रुपये आहे. टॉप व्हेरिएंट निवडणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 65 टक्के आहे. या बाइकमध्ये 398 सीसी सिंगल-सिलेंडर एअर आणि ऑइल-कूल्ड मोटर आहे.

स्पर्धेतील बाईक

Harley-Davidson X440 भारतीय बाजारपेठेतील Honda H’ness CB350, Benelli Imperiale 400 आणि Triumph Speed 400 ला टक्कर देईल. Harley-Davidson X440 हे Harley-Davidson ब्रँड आणि Hero MotorCorp यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.