fbpx

Jailer Movie: रजनीकांतचा सिनेमा रिलीज होणार म्हणून कार्यालयांना सुट्टी

रजनीकांत… बस नाम ही काफी हैं

Jailer Movie: तुम्ही दक्षिण भारतात असाल आणि रजनीकांत या कलाकाराचा सिनेमा रिलीज होणार असेल तर या कलाकाराची क्रेझ किती आहे याचा जबरदस्त अनुभव तुम्हाला येईल. त्याचा नवा सिनेमा येणं हे सणावारापेक्षा कमी नाही. त्याचा चित्रपट लागला आणि तो फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पाहिला असे केलेले फॅन्स विरळच. थिएटर बाहेरची त्याची मोठी कट आउट्स, त्यांवर केलेले दुधाचे अभिषेक, रंगीबेरंगीनवीन कपडे घालून त्याच्या सिनेमाला जाणारे, त्याचा सिनेमा पाहणाऱ्यांना थिएटर पर्यंत फुकटात सोडणारे असे एक ना अनेक फॅन्स तुम्हाला दक्षिणेत दिसतील. त्याच्या हेअर स्टाइलपासून सिगरेट पेटवण्याचा स्टाईलपर्यंत सर्व काही कॉपी करणारे त्याचे फॅन्स जगभरात आहेत. त्यामुळे त्याचा सिनेमा रिलीज होण्याच्या दिवशी कार्यालयांमध्ये शुकशुकाट असणार आहे. त्यामुळे रजनीकांत फॅन्सचा कामावर बोलावून उगाच हिरमोड करण्यापेक्षा १० ऑगस्ट रोजी सुटी जाहीर केली तर सगळ्यांनाच सिनेमाचा आनंद घेता येईल आणि गैरहजेरीमुळे होणारे नुकसान टळेल असा विचार करून बंगलोर आणि चेन्नई मधील काही कार्यालयांनी १० ऑगस्टला सुटी जाहीर केली आहे.

Jailer Movie: दमदार ओपनिंगची अपेक्षा

१० ऑगस्ट ला रिलीज होणारा रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट संपूर्ण भारतात बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करेल अशी अपेक्षा आहे. रजनीकांत जवळपास २ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जबरदस्त प्रोमोजमुळे या चित्रपटाने आधीच चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ फिव्हर न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवरही पोहोचला आहे. त्यामुळेच ‘जेलर’ला चांगली स्क्रीन प्रेझेन्स मिळण्याची अपेक्षा आहे, जी रजनीकांत यांच्यासाठी चांगली सुरुवात असेल. या सिनेमाची क्रेझ पाहून चेन्नई आणि बेंगळुरूमधील अनेक कार्यालयांनी १० ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.

१० कोटी रुपयांचे आगाऊ बुकिंग

जेलर हा चित्रपट परदेशातही चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, ‘जेलर’ २०२३ मधला भारतीय चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड्स तोडण्याच्या मार्गावर आहे. परदेशात या चित्रपटाने १० कोटी रुपयांच्या आगाऊ बुकिंगचा टप्पा आधीच ओलांडला आहे. ‘जेलर’ हा नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित अॅक्शन पॅक्ड चित्रपट आहे, ज्यामध्ये रजनीकांत एक निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून दिसणार आहेत. असे म्हटले जाते की दिग्दर्शकाने संपूर्ण चित्रपटात भावनांचे जाळे यशस्वीपणे विणले आहे.

हे ही वाचा : तमन्ना भाटिया ठरली द न्यू मल्टी-टॅलेंटेड नॅशनल क्रश

‘जेलर’मध्ये रजनीकांत यांची भूमिका

याआधी रिलीज झालेल्या शोकेसमध्ये रजनीकांत यांचे पात्र ‘टायगर’ मुथुवेल पांडियन हे दोन वेगवेगळ्या अवतारांमध्ये सादर करण्यात आले होते. या चित्रपटात सुपरस्टार एका पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. एक सामान्य माणूस तलवारी आणि बंदुकांच्या सहाय्याने वाईट लोकांशी कसा लढतो हे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

जेलरची कमाल

जेलर या चित्रपटात रजनीकांत सोबत रम्या कृष्णन, प्रियांका मोहन, शिवा राजकुमार, तमन्ना भाटिया, योगी बाबू, वसंत रवी, विनायकन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मल्याळम अभिनेते मोहनलाल यांचाही या चित्रपटात एक दमदार कॅमिओ आहे. तमन्ना भाटिया वर चित्रित झालेले ‘कावाला’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर जबरदस्त धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद लाभला आहे. हे चित्र पहाता जेलर अनेक नवीन रेकॉर्ड्स बनविणार अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *