fbpx

Book Publishing Shabdasari: पर्जन्यसरींच्या साक्षीने शब्दसरींचे प्रकाशन

Book Publishing Shabdasari

Book Publishing Shabdasari: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक योगदानात कवी -लेखकांचे योगदान फार मोठे असल्याचे मत ज्येष्ठ कवी सतीश सोळांकूरकर यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘शब्दसरी’ (Book Publishing Shabdasari) या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहोळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनच्या संचालिका कवयित्री प्रा. प्रज्ञा पंडित आणि कतार येथील महाराष्ट्र मंडळाच्या महासचिव कवयित्री मनिषा देशपांडे- पालवे तसेच शारदा प्रकाशनचे प्रा.संतोष राणे, कवी प्रसाद कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी उपस्थित होते.

काय म्हणाले सोळांकूरकर?

यावेळी बोलताना सतीश सोळांकूरकर म्हणाले, “ज्ञानेश्वरांपासून केशवसूतांपर्यंत ते आजच्या सर्वच कवी -लेखकांच्या सांस्कृतिक योगदानामुळे महाराष्ट्र वैचारीक दृष्ट्या समृद्ध आहे. अनेक म्हणून कविंचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीमध्ये कवी -लेखकांचे योगदान अद्वितीय आहे. ते नाकारता येणार नाही. प्रसाद कुलकर्णी यांच्यासारखे कवी ही सांस्कृतिक समृद्धी अधिक वाढवीत असतात. “

“प्रगतीचे सर्वोच्च शिखर जगाने गाठले आहे. शिक्षणाचा योग्य तो प्रसार होत आहे. सुशिक्षितांची नवी पिढी सर्वत्र दिसत असल्याचे सांगून ते म्हणाले,”मात्र यामध्ये आईचीवडिलांची सहा -सहा महिने वाटणी करणारी पिढी पाहिली की मन खिन्न होते. हेच का ते शिक्षण असा विचार करायला भाग पाडते. सर्व काही असूनही ही पिढी दुर्दैवी वाटायला लागते.”

आपल्या सुंदर आणि सुबोध अध्यक्षीय भाषणात सतीश सोळांकूरकर यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उर्वी – मनिषा – सुषमा या तीन पिढ्यांची उपस्थिती नमूद करताना कवी प्रसाद कुलकर्णी यांच्यावर अधिकाधिक काव्यनिर्मितीची जबाबदारी सोपवली. तसेच उपस्थित श्रोत्यांवर या कविता जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सोपवली. श्रोत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांची सादर केलेली ‘वडिलोपार्जित आई’ ही कविता श्रोत्यांना अंतर्मुख करून गेली.

Book Publishing Shabdasari : असा रंगला प्रकाशन सोहळा

कार्यक्रमाची सुरुवात कवी प्रसाद कुलकर्णी लिखित गणेश वंदनेने सौ. अपूर्वा कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवयित्री सौ. आश्लेषा राजे यांनी केले. प्रकाशनाच्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात शब्दसरी या संग्रहातील काही कविता स्वत्व ग्रुपचे कवी प्रसाद भावे, कवयित्री रोहिणी कुलकर्णी, कवयित्री आश्लेषा राजे, कवी प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केल्या.

कवी प्रसाद कुलकर्णी यांचे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड येथील मित्र श्री. संजय चौधरी, गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज औरंगाबाद येथील मित्र श्री. सुनील नन्नावरे. आणि महर्षी विद्यालय औरंगाबाद च्या माजी मुख्याध्यापिका सौ. सुषमा देशपांडे यांनीही ‘शब्दसरी’ (Book Publishing Shabdasari) मधील कविता सादर केल्या.

कवी प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘हे कविते’ या कवितेवर आश्लेषा राजे यांनी सादर केलेला भावमुद्राभिनय ही एक अभिनव कल्पना होती.

हे ही वाचा: पुस्तक परीक्षण : ‘हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात’

प्रा. प्रज्ञा पंडित यांचं भाषण

प्रमुख पाहुण्या कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या कवितांचे कौतुक केले. तसेच या संग्रहातील त्यांना भावलेली ‘बंदिस्त मन’ या कवितेतील काही कडवी त्यांनी सादर केली. या वेळी बोलतांना त्या म्हणाल्या, “कविता काळानुरूप बदलते आहे. आजची कविता ह्या काळातील संदर्भ घेऊन तयार झालेली आहे. ती पुढच्या पिढीला आजच्या काळाबद्दल सांगेल. असे मत मांडले.

मनिषा देशपांडे – पालवे यांचं भाषण

कवयित्री मनिषा देशपांडे – पालवे यांनी आपल्या मैत्रीपूर्ण संवादात कवी प्रसाद व त्यांच्या मैत्रीचा सुंदर प्रवास ऐकवतानाच या संग्रहातील ‘मनात होती कविता’ ही कविता सादर करून कवी प्रसाद कुलकर्णी यांना पुढील काव्य प्रवासास शुभेच्छा दिल्या.

प्रकाशक प्रा. संतोष राणे यांचं भाषण

शारदा प्रकाशनच्या प्रा. संतोष राणे यांनी त्यांच्या काव्यपू्र्ण भाषणातून कार्यक्रमात रंग भरले. कवी प्रसाद कुलकर्णी हे चांगले कवी आहेत तसेच चांगली व्यक्ती आहेत हे नमूद करतानाच या संग्रहाच्या पुस्तक रुपी प्रवासाचा आढावा घेतला.

पर्जन्यसरींच्या साक्षीने प्रकाशन

क्षणाचीही उसंत न घेता दिवसभर बरसणाऱ्या पर्जन्यसरींच्या साक्षीनेच ‘शब्दसरी’ (Book Publishing Shabdasari) चे प्रकाशन झाले. प्रचंड पावसातही अनेक रसिक ठाणेकरांच्या उपस्थितीने सोहोळ्याची रंगत आणखी वाढवली.