fbpx

Pakistan In Economic Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर

Pakistan In Economic Crisis

Pakistan In Economic Crisis: भारताचा नाश करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानात दारिद्र्य, अज्ञान, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, पायाभूत सुविधांची कमतरता असे प्रश्न जनतेच्या पाचवीला पूजलेले आहेत. चीन,अमेरिका आदी देशांच्या आर्थिक पाठिंब्यावर पाकिस्तानचा गाडा हाकला जात आहे. पाकिस्ताननं देशातील विकास कामांसाठी तसंच अन्य कारणांसाठी विविध देशांकडून तसंच जागतिक बँकेकडून कर्ज घेतले आहे. हे कर्ज आता इतकं वाढलं आहे की हा देश दिवाळखोरीच्या मार्गावर वाटचाल (Pakistan In Economic Crisis) करू लागला आहे.

पाकिस्तानवरील आर्थिक संकट टळण्याचं नाव घेत नाहीये. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानकडील परकीय चलन साठा संपण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात रोखीच्या टंचाईचा सामना करत आहे. याचदरम्यान पाकिस्तानला आणखी मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानचं चलन खूप घसरलं आहे. एका अमेरिकन डॉलरची किंमत २५५ पाकिस्तानी रुपये इतकी झाली आहे.

हे ही वाचा: बिग बींनी आठवली थाटामाटात साजरी केलेली होळी

पाकिस्तानी रुपयाची निच्चांकी घसरण

२५ जानेवारी रोजी पाकिस्तानी रुपयाची किंमत २३० रुपये प्रति डॉलर इतकी होती. २६ जानेवारी रोजी बाजार उघडल्यानंतर पाकिस्तानी रुपयाची आणखी मोठी घसरण झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी आहे. पाकिस्तान आधीच महागाई आणि रोखीच्या टंचाईने बेजार झालेला असताना त्यांच्या चलनाची देखील घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात आधी महापूर आणि त्यानंतर आर्थिक संकटाने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे.

आयएमएफच्या कठोर अटी स्वीकारण्याची तयारी

पाकिस्तानची तिजोरी रिकामी (Pakistan In Economic Crisis) आहे, याचदरम्यान अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांतर्गत काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, त्यांचं सरकार ६ अब्ज डॉलर्सचं रखडलेलं मदत पॅकेज जारी करण्यासाठी आयएमएफच्या कठोर अटी स्वीकारण्यास तयार आहे. पाकिस्तान अनेक देशांकडून मदत मागत आहे. परंतु पाकिस्तानची मदत करण्यासाठी कोणताही देश अद्याप पुढे आलेला नाही.

Pakistan In Economic Crisis: निधी मिळवण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न

आयएमएफने पाक सरकारला चलन आणि बाजारावरील त्यांचं नियंत्रण हटवण्यास सांगितलं होतं आणि बाजारातील शक्तींना चलन दर ठरवू द्यावेत, असंही सांगितलं होतं. ही अट मान्य करण्यात आली होती. पाकिस्तान सध्या ६.५ अब्ज डॉलर्सचा निधी मिळविण्यासाठी जागतिक संस्थांची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

Pakistan In Economic Crisis: कर्ज मिळण्याच्या शक्यता दुरापास्त

4 महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारने चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (China Pakistan Economy Corridor) अंतर्गत घेतलेले 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 22 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे आवाहन केले होते. चीनने कर्ज माफ करावे आणि सीपीईसी (CPEC) प्रकल्पाची पुनर्रचना करावी अशी पाकिस्तानची इच्छा होती. परंतु चीननं त्यासाठी स्पष्ट नकार दिल्यानं पाकिस्तान समोरचं संकट आणखी गंभीर झालं आहे. आता परदेशातून कर्ज मिळण्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता असून जागतिक बँकेकडूनही कर्ज मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारवर दिवाळखोरी जाहीर करण्याची नाचक्की ओढवू शकते.

Pakistan In Economic Crisis: पाकिस्तानमध्ये प्रचंड महागाई

पाकिस्तानमधील राखीव परकीय चलन साठा कमी असल्यामुळे तिथे महागाई वाढली आहे. अन्नधान्य देखील परवडेनासं झालं आहे. पिठाचं एक पाकीट ३,००० रुपयांमध्ये विकलं जात आहे. अन्नासाठी भांडणाऱ्या आणि फूड ट्रकचा पाठलाग करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.