Big B remembered Grand Holi Celebration: अमिताभ बच्चन यांच्या नुकत्याच झालेल्या ब्लॉग पोस्टमध्ये ते पूर्वीप्रमाणे होळी साजरी करू शकत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या तब्येतीच्या स्थितीचे वर्णन करताना, बच्चन यांनी होळीच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. (Big B remembered Grand Holi Celebration) जेव्हा होळीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असे. यासोबतच त्यांनी त्यांच्या बाबूजी हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी शेअर केल्या आहेत.
हे ही वाचा: ‘मला लोक उंट म्हणायचे…’ बिग बींनी सांगितली आठवण
मैने प्यार किया’साठी भाग्यश्री नव्हती पहिली पसंत
Big B remembered Grand Holi Celebration: अमिताभ बच्चन यांनी काय लिहिले?
अमिताभ बच्चन यांनी लिहिले, ‘घरातील उदास वातावरण आणि सर्व शारीरिक हालचालींवर बंदी असताना होळीच्या सणामध्ये सहभागी होण्यास असमर्थता.. आणि होळीचा आनंद, जो इतक्या उत्साहात साजरा केला जात होता, तो आता हरवला आहे. आणि वर्षानुवर्षे असेच आहे. बिग बींनी पुढे लिहिले, ‘ओपन हाउस..सर्वांचे आनंदाने स्वागत.
अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिलं आहे, ‘कदाचित ती वेळ पुन्हा कधीच येणार नाही..पण मला आशा आहे की ते दिवस येतील..तरी, हे कठीण वाटतं..किमान सध्या तरी..’ अशा चिंतनाच्या वेळी बाबूजींचे शब्द मनात येतात. त्यांची ‘जीवन के पहिए के नीचे’ ही कविता आठवते. या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना त्यांच्या कामातील गुण-दोषही विचारले आहेत.
Big B remembered Grand Holi Celebration: अमिताभ सोशल मीडियावर सक्रिय
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर पोस्ट शेअर करण्यासोबतच बिग बी नियमितपणे ब्लॉगही करतात. ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्यानंतर बिग बी सध्या जलसा येथील त्यांच्या घरी आराम करत आहेत. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाबद्दल सांगायचं तर या चित्रपटात प्रभास, दीपिका आणि अमिताभ यांच्याशिवाय दिशा पटनीही यात आहे. नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.