fbpx

New Education Policy: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून नवा भारत घडेल!

New Education Policy

New Education Policy: विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे तर विविध कौशल्ये विकसित करून आर्थिक सक्षमता प्राप्त करून देण्यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असल्याचे मत मुंबई विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला- वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात बुधवार, १ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘नवे शैक्षणिक धोरण २०२०: अंमलबजावणी आणि पुढील वाटचाल’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे आयोजन रामानंद आर्य डी.ए.व्ही. स्वायत्त महाविद्यालय,आणि जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र. कुलगुरू डॉ.अजय भामरे, डॉ.महेश बेडेकर, डॉ.नितीन करमळकर, डॉ.बी. एन. जगताप, प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, श्री.आनंद मापुस्कर, श्री.संतोष परुळेकर हे उपस्थित होते.

अंमलबजावणीत शिक्षकांची, स्वायत्त महाविद्यालयांची भूमिका

यावेळी बोलताना डॉ.शिर्के पुढे म्हणाले,”या धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची, स्वायत्त महाविद्यालयांची भूमिका महत्वाची ठरणार असून लवकरात लवकर सदर धोरण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हवे.यावेळी उपकुलगुरू डॉ.अजय भामरे यांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणताही बाऊ न करता स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगत याची अंमलबजाणी उत्तम होणार याची खात्री दिली.या उद्घाटनाच्या सत्रात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी कृतीयुक्त शिक्षण देण्याचे आव्हान स्वीकारायला प्राध्यापकांनी तयार राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आणि महात्मा गांधींच्या शिक्षणविषयक संकल्पनांची आवश्यकता असून नवीन शैक्षणिक धोरणात त्याचे प्रतिबिंब आपल्याला पहायला मिळेल असे यावेळी त्या म्हणाल्या.

हे ही वाचा: डिजिटल रुपयाचा पायलट 1 डिसेंबर पासून – आरबीआयची घोषणा

उच्च शिक्षणाचे भारतीयीकरण करण्याची गरज

या चर्चासत्रात आपल्या मुख्य भाषणात पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व सदर धोरण अंमलबजाणी समितीचे प्रमुख श्री. नितिन करमाळकर यांनी उच्च शिक्षणाचे भारतीयीकरण करण्याची गरज असल्याचे सांगितले.सोबतच शिक्षणातून विविध कौशल्ये,नीतिमूल्ये आणि सोबतच मातृभाषेत शिक्षण या सर्व बाबींचा समावेश या धोरणात असल्याचे यावेळी अधोरेखित केले. साचेबद्ध निकष बाजुला ठेवत प्रत्यक्ष कृती करून शिकण्यावर भर देणाऱ्या नवनविन आंतरशाखीय अभ्यासक्रमांचा आराखडा तयार करण्याचे त्यांनी आवाहन केले. विद्या प्रसारक मंडळाचे डॉ.महेश बेडेकर यांनीही हे शैक्षणिक धोरण राबवताना अडचणी येतील पण आपण त्या पार करून चांगली अंमलबजावणी करू हा विश्वास यावेळी दिला. या प्रसंगी एस. एन. बोस मुलभुत विज्ञान केंद्राचे अध्यक्ष डॉ.बी. एन. जगताप, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.रविंद्र कुलकर्णी,श्री.आनंद मापुस्कर, प्रा.संतोष परुळेकर हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

विद्या प्रसारक मंडळाचे डॉ.विजय बेडेकर, जयंत कयाळ,डॉ.विजय जोशी उपस्थित होते.तसेच अनेक शिक्षणतज्ञ, प्राचार्य, उपप्राचार्य,प्राध्यापक,शिक्षक ,विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.