fbpx

Pakatlya Karanji: पाकातल्या करंज्या

Pakatlya Karanji

Pakatlya Karanji: दिवाळीच्या फराळात कारंजी हा प्रकार आवर्जून केला जातो. करंज्या बनविण्याचे अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक चविष्ट प्रकार आज आपण इथे पहाणार आहोत. पाकातल्या करंज्या (Pakatlya Karanji) कशा बनवायच्या? चला पाहुयात:

साहित्य:

  • दीड वाटी मैदा
  • पाऊण वाटी रवा
  • ४ टे. चमचा पातळ डालडाचे मोहन
  • पाव चमचा मीथ व थोडे दूध

सारण जिन्नस

  • १ लहान बाटली गुलकंद
  • १ वाटी ओले खोबरे
  • ३-४ खारका
  • १ टेबल स्पून बेदाणा
  • २ टेबल स्पून काजू तुकडा
  • २ टेबल स्पून खडीसाखरेचा चुरा
  • पाक करण्यासाठी – ३ वाट्या साखर

कृती

  • रवा, मैदा, मीठ व तुपाचे मोहन एकत्र करून दुधात पीठ भिजवा.
  • दोन तासांनी कुटून घ्या.
  • ओले खोबरे परतून घ्या व गुलकंदात मिसळा.
  • खारका व काजू ह्यांचे बारीक तुकडे करा.
  • नंतर सारणासाठी सांगितलेल्या सर्व वस्तू एकत्र करा.
  • पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
  • त्यात वरील सारण थोडेसे भरा.
  • नंतर नेहमीप्रमाणे दुमडून करंज्या कातून घ्याव्या व तळून घ्याव्या.
  • साखरेचा दोनतारी पाक करावा.
  • तळलेल्या करंज्या पाकात टाकाव्या आणि तुमच्या पाकातल्या करंज्या (Pakatlya Karanji) तयार होतील.