Pohyancha Chivda: भाजक्या पोह्यांचा चिवडा

भाजक्या पोह्यांचा चिवडा (Pohyancha Chivda) बनवल्या सोपा आणि चवीला एकदम चटपटीत. दिवाळीच्या फराळात हा चिवडा हवाच. कसा बनवायचा? चला पाहूया:
साहित्य
- २५० ग्रॅम भाजके पोहे
- अर्धा वाटी तेल
- पाव कप शेंगदाणे
- १ चमचा बडीशेप
- १० – १२ कडिपत्त्याची पाने
- पाव कप खोबर्याचे काप
- १ चमचा मोहरी
- चिमुटभर हिंग
- १ चमचा तिखट
- पाव चमचा हळद
- १ ते २ चमचे चिवडा मसाला
- १ चमचा पिठीसाखर
हे ही वाचा: पाकातल्या करंज्या
कृती
- प्रथम भाजके पोहे निवडून घ्या आणि मंद आचेवर हलकेसे भाजून घ्या.
- आता कढईत तेल घालून शेंगदाणे, खोबर्याचे काप एक एक करून सोनेरी रंगावर तळून भाजक्या पोह्यांवर घाला.
- नंतर उरलेल्या तेलात कढीपत्ता घालून कुरकुरीत तळून घ्या.
- कढीपत्ता काढून घ्या व तेलात मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि चिवडा मसाला घालून परतून घ्या.
- आता हे सर्व भाजक्या पोह्यांवर टाका.
- चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- तयार झालेला चिवड्यामध्ये पिठीसाखर घालून मंद गॅसवर पुन्हा ३ ते ४ मिनीटे चांगला परतून घ्या.
- तयार आहे खमंग, चटपटीत भाजक्या पोह्यांचा चिवडा.