fbpx

OMG 2 ला ‘A’ सर्टिफिकेट दिल्याबद्दल अक्षय कुमारने व्यक्त केली नाराजी

OMG 2 Got A Certificate - Akshay Kumar Reacts

OMG 2 ला ‘A’ सर्टिफिकेट – अक्षय कुमारने व्यक्त केली नाराजी : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘OMG 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमित राय दिग्दर्शित हा चित्रपट शाळांमधील लैंगिक शिक्षणाच्या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाला त्याच्या विषयामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. हा चित्रपट सेन्सर बोर्डाकडे बरेच दिवस अडकला होता. त्यामुळे हा चित्रपट निर्मात्यांना फारसा प्रोमोट करता आला नाही. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, या चित्रपटाला अनेक अटी आणि कट्स सहित सेन्सर बोर्डाने ‘A’ प्रमाणपत्र दिले. आता हा चित्रपट फक्त प्रौढांसाठीच असल्याने याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसत आहे.

OMG 2 ला ‘A’ सर्टिफिकेट

या चित्रपटात अक्षय कुमार याआधी भगवान शिकाची भूमिका साकारत होता. त्याचवेळी सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेचे पालन करत अक्षय कुमारला चित्रपटात शिव दूत म्हणून दाखवण्यात आले. यासोबतच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात आणखी महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानंतर या चित्रपटाला CBFC ने ‘A’ प्रमाणपत्र दिले. यावर आता अक्षय कुमारने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

अक्षय कुमारने व्यक्त केली नाराजी

‘OMG 2’ ला ‘A’ सर्टिफिकेट मिळाल्यावर अक्षय कुमारने नाराजी व्यक्त केली, खरं तर नुकताच अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांसोबत ‘OMG 2’ पाहण्यासाठी मुंबईतील एका थिएटरमध्ये पोहोचला होता. जिथे त्याने चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. स्क्रिनिंगनंतर, त्याने प्रेक्षकांशी संवाद साधला आणि जेव्हा प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले तेव्हा अक्षयने CBFC वर ताशेरे ओढले आणि म्हणाला, “एक गमतीची गोष्ट ही आहे की हा पहिला प्रौढ चित्रपट आहे जो मुलांसाठी बनवला गेला आहे”. तसेच पाहिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. थिएटरचा हा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.

चित्रपटाची कमाई

OMG 2 चे कलेक्शन चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे तर OMG 2 ने 10.26 कोटी कमावले. दुसरीकडे, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 15.30 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे चित्रपटाने दोन दिवसांत 25.56 कोटींची कमाई केली आहे. एकीकडे OMG 2 ला ‘A’ सर्टिफिकेट मिळाल्याने अक्षय कुमारचा हा चित्रपट सिनेमागृहात फक्त प्रौढ प्रेक्षकांना पहाता येणार आहे. फक्त प्रौढांसाठीच असल्याने चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग मर्यादित झाला आहे तर दुसरीकडे या आठवड्यात रिलीज झालेल्या रजनीकांतच्या ‘जेलर’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटांशी हा चित्रपट मुकाबला करत आहे ज्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होत आहे.

‘OMG 2’ मध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत, याशिवाय पवन राज मल्होत्रा, गोविंद नामदेव, आरुष वर्मा, अरुण गोविल आणि ब्रिजेंद्र काला हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘OMG 2’ हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झालेल्या उमेश शुक्ला दिग्दर्शित OMG चा सिक्वेल आहे. ज्यामध्ये अक्षय कुमारने भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत परेश रावल मुख्य भूमिकेत होते.