fbpx

Gadar 2 Box Office Collection : ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Gadar 2 Box Office Collection : सनी देओल व अमीषा पटेलचा ‘गदर २’हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट तुफान कमाई केली. ‘गदर २’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे हिंदी चित्रपट उद्योगाला नक्कीच दिलासा देणारे आहेत. पहिल्या दोन दिवसात ‘गदर २’ ने जवळपास ८३ कोटींचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट रिलीज होऊन १० दिवस झाले तरी त्याची बॉक्स ऑफिस वर घोडदौड कायम आहे. दुसऱ्या आठवड्यातही सुट्टी नसताना वीक डेज मध्ये चित्रपटाने दमदार कमाई करत २०० करोडचा आकडा सहज पार केला आणि आता १२ व्या दिवशी या चित्रपटाने ४०० करोडचाही पल्ला पार केला आहे.

Gadar 2 Box Office Collection: रेकॉर्ड ब्रेक कमाई

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी रिलीज होण्यापूर्वी ‘गदर २’ची आगाऊ बुकिंग जोरदार होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाची 7 लाखांहून अधिक तिकिटे आगाऊ बुक करण्यात आले होते. तर शनिवारी हा आकडा जवळपास 6.3 लाख होता. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने १३३.१८ कोटींची कमाई केली आहे.

हे ही वाचा : ‘फुले’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

सनी देओलचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ने पहिल्या दिवशी १.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.२७ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १.६० कोटींची कमाई केली होती. २२ वर्षांपूर्वी या चित्रपटाने एकूण ७६.६५ कोटींचा गल्ला जमवला होता.

१२ दिवसात कमावले ४०० करोड

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन चित्रपटांनी 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. या वर्षाच्या सुरवातीला शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या ‘पठाण’ चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला होता. आता सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या ‘गदर 2’ नेही हा कारनामा करून दाखविला आहे. गदर २ ने ही आता ४०० कोटीच्या या खास क्लबमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. ‘पठाण’ चित्रपटाने रिलीजच्या 11व्या दिवशी 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता तर ‘गदर 2’ चित्रपटाने 12व्या दिवशी हा अद्भुत पराक्रम करून दाखवला आहे.

बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड

‘गदर 2’ चित्रपटातील सर्व स्टार्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या 12व्या दिवशी म्हणजे 2रा मंगळवारी, गदर 2 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आपली जोरदार दौड सुरू ठेवली आणि सुरुवातीच्या ट्रेंडनुसार सुमारे 11.50 कोटी रुपये गोळा केले. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 400.10 कोटी रुपये झाले आहे. हा आकडा पार करणारा ‘गदर 2’ हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील दुसरा हिंदी चित्रपट आहे.

४०० करोड क्लबचे मानकरी

‘पठाण’ आणि ‘गदर 2’ या हिंदीमध्ये बनलेल्या आणि प्रदर्शित झालेल्या चित्रपटांव्यतिरिक्त, या क्लबमध्ये इतर भाषांमध्ये बनवलेल्या आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली 2’ आणि ‘KGF 2’ या आणखी दोन चित्रपटांचा समावेश आहे. या यादीत आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील संजय दत्त आणि शाहरुख खान या दोनच नायकांचा समावेश होता. नायिकांमध्ये मध्ये दीपिका पदुकोणचेच नाव या यादीत आहे. आता सनी देओल, उत्कर्ष शर्मा, अमिषा पटेल आणि सिमरत कौर यांनीही या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

400 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार्‍या दिग्दर्शकांमध्ये अनिल शर्माची एंट्री सर्वात नवी आहे. त्यांच्या आधी SS राजामौली आणि प्रशांत नील त्यांच्या ‘बाहुबली 2’ (तेलुगु) आणि ‘KGF 2’ (कन्नड) चित्रपटांच्या हिंदी डब केलेल्या आवृत्त्यांमुळे या क्लबमध्ये होते. यावर्षी ‘पठाण’ चित्रपटामुळे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचे नाव या यादीत आले.

पुढच्या वीकेंडची ऍडव्हान्स बुकिंगही जोरात

पुढच्या वीकेंडसाठीही ‘गदर 2’ चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंगही जोरात सुरू आहे. चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग पाहता चित्रपटाचा तिसरा आठवडाही उत्तम राहण्याची अपेक्षा आहे आणि चित्रपटाच्या कमाईचा वेग तिसऱ्या आठवड्यातही कायम राहिला तर हा चित्रपट ‘पठाण’चा रेकॉर्ड तिसऱ्या आठवड्यातच मोडेल आणि तस झालं तर हा चित्रपर हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल हे नक्की आहे.

सिंगल स्क्रीन सिनेमांना नवसंजीवनी

सिंगल स्क्रीन सिनेमांसाठीही ‘गदर २’ नवसंजीवनी देणारा ठरला आहे. कोरोना नंतरच्या काळात एकूणच सिनेमा व्यवसायाला मरगळ आली होती आणि सिंगल स्क्रीन सिनेमांवर त्याचा जास्त परिणाम झाला होता. ‘गदर २’ या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी प्रेक्षकानी मात्र या चित्रपटाला पसंती दर्शविली आहे आणि त्याचा छोट्या सिंगल स्क्रीन सिनेमांना फायदा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *