Navarang Festival 2022: बेडेकर कॉलेजमध्ये ‘नवरंग’ चा जल्लोष
Navarang Festival 2022: सध्या ठाण्यातल्या जोशी बेडेकर कॉलेज मध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. निमित्त आहे ‘नवरंग’ (Navarang Festival 2022) या वार्षिक मोहोत्सवाचं. या महोत्सवामध्ये विध्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहेत. ‘नवरंग’च्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या रंगात कॉलेजचा परिसर रंगून गेला आहे.
Navarang Festival 2022: ‘नवरंग’ चा जल्लोष
ठाण्यातले विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर कला-वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय आभ्यासक्रमांबरोबर कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातही विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून देत असते. या माहाविद्यालयाचा वार्षिक ‘नवरंग’ महोत्सव हा ठाण्यातल्या लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या मोहोत्सवाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील अनेक मान्यवर या महोत्सवाला दरवर्षी उपस्थित असतात.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. ‘नवरंग’ (Navarang Festival 2022) मधून अनेक कल्पकतापूर्ण स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी दिली.
हे ही वाचा: भारताची सरगम कौशल बनली मिसेस वर्ल्ड 2022
विविध उपक्रम
रंगीबेरंगी ‘डे’ज साजरे होत असताना विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत आहेत. ‘नवरंग’ प्रमुख प्रा.योगेश प्रसादे आहेत. संपूर्ण महाविद्यालयात अभ्यासासोबत विद्यार्थी नृत्य, संगीत, गायन,वक्तृत्व,बातमीवाचन, काव्यलेखन,सेल्फ टॉक, ट्रेड माईन, क्विझ, फोटोग्राफी आणि वर्ड सर्च, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, इत्यादी अनेक स्पर्धांचे मंगळवार 20 डिसेंबर 2022 पासून आयोजन करण्यात आलेले आहे.
प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संगीत खुर्चीचे आयोजनही करण्यात आलेले आहे. क्रीडा महोत्सवाअंतर्गत विविध मैदानी स्पर्धांचे आयोजनही करण्यात आलेले आहे.