India’s Sargam Koushal wins Mrs World 2022: १७ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे आयोजित समारंभात अमेरिकेच्या मिसेस वर्ल्ड 2021 शेलिन फोर्ड यांनी मुंबईच्या सरगम कौशल यांच्या डोक्यावर मिसेस वर्ल्ड (India’s Sargam Koushal wins Mrs World 2022) चा मुकूट ठेवला आणि २१ वर्षांनी पुन्हा हा किताब भारताकडे आला. मिसेस पॉलिनेशियाला फर्स्ट रनर अप म्हणून घोषित करण्यात आले, त्यानंतर मिसेस कॅनडाला सेकंड रनर अप म्हणून गौरविण्यात आले. मिसेस इंडिया स्पर्धेच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर विजेत्याची घोषणा करण्यात आली.
India’s Sargam Koushal wins Mrs World 2022: 21 वर्षांनी भारताला मिळाला किताब
भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्डचा किताब (India’s Sargam Koushal wins Mrs World 2022) पटकावला आहे. हा ताज 21 वर्षांनी भारतात परतला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता, त्यापैकी सरगम कौशलने बाजी मारली आहे. मूळची जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेली सरगम व्यवसायाने शिक्षिका आहे. तिने 2018 मध्ये नौदलाच्या अधिकाऱ्याशी लग्न केले. सरगमने आपल्या यशाचे श्रेय तिचे वडील आणि पती यांना दिले आहे.
मिसेस इंडिया स्पर्धेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर याची घोषणा करण्यात आली आहे. मुकुटाच्या क्षणाची एक झलक इथे शेअर करताना लिहिले आहे की, दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. हा मुकुट 21 वर्षांनंतर परत आला आहे. सरगमपूर्वी 2001 मध्ये डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी हा किताब जिंकला होता.
पुरस्कारासाठी ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता. यापूर्वी, सरगमने १५ जून २०२२ रोजी मिस इंडिया वर्ल्ड २०२२ चा पुरस्कार जिंकला होता. त्यांना ही पदवी नवदीप कौर यांनी दिली होती.
हे ही वाचा: नववर्षाचं मुंबईकरांना मिळणार ‘बेस्ट’ गिफ्ट: डबल डेकर आणि ई कॅब सेवा होणार सुरु
कोण आहे सरगम कौशल?
जम्मू-काश्मीरमधील 32 वर्षीय सरगम कौशलने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सरगमने विशाखापट्टणममध्ये शिक्षिका म्हणूनही काम केले आहे. सरगमचे 2018 मध्ये लग्न झाले, तिचा नवरा भारतीय नौदलात आहे.
2001 मध्ये भारताने शेवटचा हा मुकुट जिंकला होता
डॉ. आदिती गोवित्रीकर यांनी 21 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकला होता. हा ताज जिंकणारी अदिती पहिली भारतीय महिला ठरली. अदिती देखील एक अभिनेत्री आहे, तिने भेजा फ्राय, दे दना दान, स्माईल प्लीज सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
मिसेस वर्ल्ड स्पर्धेचा इतिहास
मिसेस वर्ल्ड ही जगातील पहिली अशी सौंदर्य स्पर्धा आहे, जी विवाहित महिलांसाठी बनवण्यात आली आहे. या स्पर्धेची सुरुवात 1984 मध्ये झाली. पूर्वी स्पर्धेचे नाव मिसेस अमेरिका होते, जे नंतर मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड असे बदलले गेले. पुढे 1988 मध्ये याला मिसेस वर्ल्ड असे नाव देण्यात आले. मिसेस वर्ल्ड खिताब जिंकणारी पहिली महिला श्रीलंकेची रोझी सेनायाके होती.