fbpx

Healthy Methi Khakhra: मेथी खाकरा

Methi Khakhra

Methi Khakhra: गुजराती कुटुंबांच्या दैनंदिन नाश्त्याचा, प्रवासात हमखास हवा असलेला असा खाकरा एक पौष्टिक पदार्थ आहे. मेथीचा खाकरा (Methi Khakhra) हा खुसखुशीत पदार्थ बंद डब्यात ठेवल्यास अनेक दिवस टिकू शकतो.

Methi Khakhra: साहित्य

  • दीड वाटी गव्हाचे पीठ
  • पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने
  • एक छोटा
    चमचा ओवा
  • एक छोटा चमचा तीळ
  • पाव छोटा चमचा मिरची पावडर
  • पाव छोटा चमचा हळदी पावडर
  • दोन चमचे तेल
  • चवीपुरते मीठ

हे ही वाचा: दडपे पोहे

Methi Khakhra: कृती

  • मेथीच्या पानामध्ये ओवा, तीळ, तिखट, हळद, तेल आणि मीठ घाला. हे साहित्य मेथीची पाने मऊ होईपर्यंत एकत्र कालवा.
  • या मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ मिसळा आणि अंदाजाने जरूरीपुरते पाणी घालून पीठ मळा.
  • यानंतर हे पीठ एक तास भिजवून ठेवा.
  • पिठाचे छोटे गोळे करून पातळ लाटा. ते तव्यावर टाकल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप घाला.
  • मंद आचेवर खाकरा कापडाने दाब देऊन कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • मेथी खाकरा चहा सोबत किंवा ओली चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.