fbpx

Friendship Day: मैत्री दिन

Friendship Day: ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे (Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. मैत्री दिनाची ओळख कॉलेजच्या पहिल्या वर्षी झाली. नवीन कोणाशी माझी मैत्री पटकन होत नाही, खुप कमीजणांशीच कनेक्ट होते कायम… त्यामुळे काॅलेजची भितीच होती की कसा निभाव लागेल.

तर, काॅलेज सुरु झाल्यावर थोड्या दिवसात आला Friendship Day. रंगीबेरंगी रिबीनी, फ्रेंडशिप बँड्सने सगळे जण अक्षरशः लगडलेले दिसत होते. माझा अगदी मोजक्या दोन तीन मैत्रिणींचा ग्रुप असल्यामुळे तेवढ्याच रिबिनी बांधून कॉलेजच्या पाचही वर्षांचा मैत्री दिवस साजरा झाला.

काॅलेज संपलं, नोकरी सुरू झाली, तिथेही अगदी मोजक्याच कलिग्जचा गृप होता.

हे ही वाचा: मराठी भाषा दिन – 27 फेब्रुवारी

कालपरत्वे आता हे लक्षातही आलं आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच! काॅलेजमधल्या दिवसात दंडापासुन हाताच्या बोटापर्यंत बांधलेल्या रिबीनी किंवा आताच्या प्रॅक्टिकल आयुष्यात फक्त कामापुरता इर्दगिर्द वावरणाऱ्या असंख्य व्यक्तींपेक्षा ती मोजकी, मुठभर. आपल्या प्रेमाच्या बळावर कमावलेली आणि काळजात घर केलेली माणसे जास्त मोलाची! जी आपल्या एका हाकेला ओ देऊन धावत येतात. त्यांच्या आयुष्यात रमलेले असतानाही, आपला ऍबसेन्स ते नोटीस करतात, आपली काळजी घेतात.

खरं सांगायचं तर, आयुष्य अशा मित्रमंडळींमुळेच तर सुसह्य होतं… आपल्या सगळ्यांचंच!

अशा माझ्या विस्तारलेल्या सगळ्या कुटुंबाला मनापासुन मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

– प्रा. प्रज्ञा पंडित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *