Healthy Dadape Pohe: दडपे पोहे
Dadape Pohe: दडप्या पोह्यांमध्ये टोमॅटो, खोबरे, कोथिंबीर, पौठे यांसारखे पदार्थ कच्चे घातल्यामुळे हे पोहे (Dadape Pohe) खूपच पौष्टिक असतात.
Dadape Pohe: साहित्य
- दोन वाट्या पातळ पोहे
- पाव वाटी किसलेले ओले खोबरे
- एक छोटा किसलेला किंवा चिरलेला कांदा एक चिरलेला टोमॅटो
- दोन मिरच्या
- अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
- अर्धे लिंबू
- पाव वाटी शेंगदाणे
- आल्याचा एक इंच तुकडा
- फोडणीचे साहित्य : दोन छोटे चमचे तेल, तीन-चार कढिपत्ते, एक छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा मोहरी
हे ही वाचा: भाजक्या पोह्यांचा चिवडा
Dadape Pohe: कृती
- सुरूवातीला छोट्या कढईत फोडणी करून त्यात मिरची, कढिपत्ता व शेंगदाणे घाला. ही फोडणी कोरड्या पोह्यांवर घाला.
- पोहे व्यवस्थित हलवून घ्या. नंतर त्यात किसलेले ओले खोबरे, आले, किसलेला किंवा बारीक केलेला कांदा व चिरलेला टोमॅटो घाला.
- हे मिश्रण दहा मिनिटे दडपून म्हणजेच झाकून ठेवा.
- यानंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ घाला. लिंबू पिळून पोहे चांगले मिसळा.
- फोडणी न देताही हे पोहे नुसते तेल व इतर साहित्य वरून घालून करता येतात.