fbpx

Besan Ladoo: बेसनाचे लाडू

Besan Ladoo: दिवाळीचा फराळ बेसनाच्या लाडवांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. बेसनाचे लाडू (Besan Ladoo) बनवायला सुमारे ६० ते ७५ मिनिटांचा कालावधी लागतो पण तरीही ते बनवायला खूप सोपे आणि खायलाही रुचकर असतात. कसे बनवायचे बेसन लाडू? चला पाहुयात.

Besan Ladoo: साहित्य

 • २ कप बेसन
 • १/२ कप साजूक तूप (घट्ट)
 • १ कप पिठी साखर (टीप क्र.२ बघा)
 • १/४ टीस्पून वेलचीपूड (टीप क्र.२ बघा)
 • १ टेबलस्पून बदामाचे काप
 • १ टेबलस्पून बेदाणे, चारोळी किंवा काजू (सजविण्यासाठी)

हे ही वाचा: आलू भुजिया

Besan Ladoo: कृती

 • कढईत तूप गरम करा. त्यात बेसन घालून व्यवस्थित मिक्स करा. बेसन आणि तुपाचे मिश्रण सोनेरी तपकिरी रंगाचे होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.बेसन भाजताना सतत चमच्याने हलवत राहा नाहीतर ते भांड्याला खाली लागून करपू शकते.
 • सुरवातीला भाजताना बेसन परतायला थोडं जड जाईल. मिश्रण कोरडं आहे असं वाटेल पण हळू हळू तुपामुळे मिश्रण किंचित पात्तळ होईल लागेल.साधारण ४०-४५ मिनिटे सतत भाजावं लागेल. गरज वाटल्यास वरून आणखी चमचाभर तूप घाला. सोनेरी तपकिरी रंग आला कि, बेसन आणि तुपाचे हे मिश्रण हलकं होईल आणि परतायला सोपं जाईल. याचा अर्थ बेसन व्यवस्थित भाजलं गेलं आहे.
 • गॅस बंद करा. ७-८ तास बेसन पूर्णपणे थंड होऊ द्या.
 • पिठी साखरेत वेलची पूड घालून एकत्र करा. बेसन पूर्ण थंड झाला कि त्यात बेदाणे,बदामाचे काप आणि पिठी साखर घाला आणि सगळं मिश्रण हाताने कालवून त्याचे लाडू वळा.
 • लाडू सुशोबित करण्यासाठी वळताना त्यावर बेदाणा, चारोळी किंवा काजू लावू शकता.
 • लाडू वळल्यानंतर थोडा वेळ ताटात ठेवून द्या. सुकून थोडे घट्ट झाल्यावर डब्यात भरा.

टीप:

 • बेसन व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर लाडू चवीला चांगले लागत नाहीत त्यामुळे बेसनाचे लाडू करताना बेसन छान गोल्डन ब्राऊन भाजणं खूप महत्वाचा असतं.
 • पिठी साखर करण्यासाठी, साखर दळतानाच त्यात वेलची घालून दळा.
 • दिलेल्या प्रमाणापेक्षा किंचित कमी साखर घाला. चव बघून मग गरज वाटली तर उरलेली साखर घाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *