fbpx

Bajri Wade: बाजरी वडे

Bajri Wade बाजरी वडे

Bajri Wade: बाजरीच्या पिठाचा एक पौष्टिक आणि खमंग खुसखुशीत पदार्थ आज आपण बनवणार आहोत. बाजरीचे वडे (Bajri Wade) बनवायला साधारण ३०-४० मिनिटे इतका अवधी लागतो. कसे करायचे बाजरी वडे? (Bajri Wade:) चला जाणून घेऊयात.

Bajri Wade: साहित्य

  • ४ वाट्या बाजरीचे पीठ
  • 2 टे स्पून आलं, हिरवी मिरची, लसूण पेस्ट
  • 2 टी स्पून काश्मिरी लाल तिखट
  • 2 टी स्पून जिरे पूड
  • 2 टी स्पून धने पूड
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • 3 टे स्पून दही किंवा २ कप ताक
  • 1 1/2 टे स्पून तीळ
  • हिंग, हळद , मीठ , साखर चवीनुसार
  • 2 टे स्पून तेल
  • पाणी

हे ही वाचा: खमंग अळूवडी

Bajri Wade: कृती

  • बाजरीच्या पिठात वरील सर्व जिन्नस एकत्र करून पीठ मळून घ्या.
  • एकदम सैल वा एकदम घट्ट मळू नका. दह्याऐवजी (आणि पाणी न घालता) पीठ ताकातच मळले तरी चालेल.
  • पीठ मळून झाले की तसेच अर्धा तास झाकून ठेवा.
  • आता कढईत तेल गरम करा.
  • मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून हातावरच वडे थापा आणि मंद आचेवर तळा.
  • सॉस, दही किंवा हिरव्या चटणीसोबत गरम गरम बाजरी वडे (Bajri Wade) सर्व्ह करा.