fbpx

Thalaivar 170: रजनीकांतच्या ‘थलैवर 170’चे नवीन अपडेट, चित्रपटात या स्टार्सची एन्ट्री

Thalaivar 170 | थलैवर 170: रजनीकांतचा आगामी ‘थलाईवर 170’ (Thalaivar 170) हा चित्रपट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रजनीकांतच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी

रजनीकांतच्या चाहत्यांसाठी ऑक्टोबरची सुरुवात नक्कीच चांगली झाली आहे. वास्तविक, थलैवाच्या आगामी चित्रपटाचे संगीतकार आणि दिग्दर्शक, ज्याचे नाव सध्या ‘थलैवर 170’ आहे, त्याची घोषणा करण्यात आली आहे. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार,या चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीमचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल करणार असून लायका प्रॉडक्शनचे सुबास्करन निर्मित आहेत. या चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदरने दिले आहे, ज्यांनी यापूर्वी रजनीकांतच्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अॅक्शन-पॅक एंटरटेनर

हा शीर्षक नसलेला चित्रपट एक अॅक्शन-पॅक एंटरटेनर असेल अशी अपेक्षा आहे, ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांतची अनोखी शैली दिसून येईल. या चित्रपटाची कथा काय असेल याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी रजनीकांत या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : ‘टायगर व्हर्सेस पठाण’ची स्क्रिप्ट झाली फायनल, चित्रीकरण पुढच्या वर्षी

थलैवर १७१

‘थलैवर 170’ शिवाय रजनीकांत यांच्याकडे ‘थलैवर १७१’ हा चित्रपट देखील आहे. ‘मास्टर’, ‘कैथी’, ‘विक्रम’ आणि ‘लिओ’ सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले लोकेश कनकराज या चित्रपटाचे दिग्दर्शक असतील. सन पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे संगीतही अनिरुद्ध रविचंदरच देणार आहे.

काही आठवड्यांत सुरु होणार चित्रीकरण

जेलरच्या यशानंतर, सुपरस्टार रजनीकांतचा ‘थलैवर 170’ येत्या काही आठवड्यांत फ्लोरवर जाण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाबाबत सातत्याने अपडेट्स येत आहेत. दरम्यान, या चित्रपटात आणखी काही स्टार्सनी एन्ट्री केली आहे. या चित्रपटात मंजू वारियर, दुशारा विजयन आणि रितिका सिंग यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे गणनवेल करणार आहेत. सध्या चित्रपटाचे तात्पुरते नाव ‘थलैवर 170’ ठेवण्यात आले आहे. याआधी टीजेने ‘जय भीम’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी अनिरुद्ध रविचंदरची निवड करण्यात आली आहे.

कलाकारांच्या समावेशाची सोशल मीडियावर घोषणा

2 ऑक्टोबर रोजी, लायका प्रॉडक्शनने टीममध्ये नवीन कलाकारांच्या समावेशाची घोषणा केली आणि प्रत्येकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. टीमचा भाग झाल्यानंतर रितिकानेही इन्स्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त केला आणि निर्मात्यांचे आभार मानले.

सुपरस्टार रजनीकांत शेवटचे दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या ‘जेलर’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाने जगभरात 650 कोटींची कमाई करून ब्लॉकबस्टरचा किताब पटकावला आहे. सुपरस्टार रजनीकांत सध्या ब्रेकवर आहेत आणि ऑक्टोबरमध्ये कधीतरी ‘थलाईवर 170’ ची शूटिंग सुरू करणार आहेत.

टीम येत्या काही दिवसांत कलाकारांच्या उर्वरित सदस्यांची घोषणा करेल. रिपोर्ट्सनुसार, राणा दग्गुबती, फहद फासिल आणि मंजू वॉरियर देखील कलाकारांचा भाग आहेत. ‘थलैवर 170’ हा चित्रपट 2024 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.