fbpx

Tiger Vs Pathaan : ‘टायगर व्हर्सेस पठाण’ची स्क्रिप्ट झाली फायनल, चित्रीकरण पुढच्या वर्षी

Tiger Vs Pathaan Script Finalised

Tiger Vs Pathaan | टायगर व्हर्सेस पठाण : ‘टायगर व्हर्सेस पठाण’ हा YRF spy universe चा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. दरम्यान, चित्रपट निर्माता आदित्य चोप्राने सलमान आणि शाहरुखला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितल्याची बातमी आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. अॅटली दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडत आहे. किंग खान आणि नयनताराची ऑनस्क्रीन जोडी सिनेकलाकारांना खूप आवडत आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोणच्या कॅमिओने ही चाहत्यांना वेड लावले आहे. दरम्यान, शाहरुखच्या आणि सलमानच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. भाईजान म्हणजेच सलमान खान देखील या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून एका छोट्या भूमिकेत दिसला होता. दोन्ही खानांचीही जोडी पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरली होती. आता हीच जोडी यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहे.

‘टायगर व्हर्सेस पठाण’ बद्दल नवीन अपडेट

एकीकडे सलमान त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटात व्यस्त आहे. दुसरीकडे, चाहते YRF स्पाय युनिव्हर्सच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाची, शाहरुख खान आणि सलमान खानच्या ‘टायगर व्हर्सेस पठाण’ची वाट पाहत आहेत. दरम्यान, चित्रपट निर्माता आदित्य चोप्राने या चित्रपटाची स्क्रिप्ट दोन्ही सुपरस्टारना ऐकविल्याची बातमी आहे.

हे ही वाचा : बहुप्रतिक्षित ‘फायटर’चा फर्स्ट लूक समोर

शाहरुख-सलमानला स्क्रिप्ट आवडली

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, दोन्ही मेगास्टार्सनी स्क्रिप्टवर सहमती दर्शवली आहे आणि त्यानंतर टायगर व्हर्सेस पठाणची स्क्रिप्ट लॉक करण्यात आली आहे.या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सिनेप्रेमींमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. आदित्य चोप्राने शाहरुख आणि सलमानची भेट घेऊन चित्रपटाची कथा दोघांनाही ऐकवली असल्याचे सांगितले आहे. या दोघांनाही चित्रपटाची कथा आवडली असून आता हा चित्रपट मार्चमध्ये फ्लोरवर जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

YRF स्पाय युनिव्हर्स चा सहावा चित्रपट

सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा ‘टायगर व्हर्सेस पठाण’ हा चित्रपट अ‍ॅक्शनने भरलेला असेल. कबीर खानचा ‘एक था टायगर’, अली अब्बास जफरचा ‘टायगर जिंदा है’, सिद्धार्थ आनंदचे ‘वॉर’ आणि ‘पठाण’ आणि मनीष शर्मा यांच्या ‘टायगर ३’ नंतर YRF स्पाय युनिव्हर्स मधला हा सहावा चित्रपट असेल.