Yummy Basundi: चविष्ट बासुंदी
Yummy Basundi: बासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा गोड पदार्थ आहे ज्यात सुका मेवा घातला जातो. चव वाढवण्यासाठी त्यात वेलची आणि जायफळाचा देखील वापर केला जातो. हा पदार्थ महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. कसा बनवायचा हा पदार्थ? जाणून घेऊयात अगदी सोपी रेसिपी.
Yummy Basundi: साहित्य
- 1.2 लीटर दूध
- 2 चमचे फ्रेश क्रीम
- 1 चमचे खवा
- आवश्यकतेनुसार हिरवी वेलची
- आवश्यकतेनुसार केशर
- 2 चमचे कापलेले बदाम, पिस्ता
- 2 चमचे साखर
- आवश्यकतेनुसार पाणी
हे ही वाचा: पुरण पोळी
Yummy Basundi: कृती
- सर्वात आधी कोमट पाण्यात केशर भिजत ठेवावे.
- एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवावे. पाणी उकळू लागताच त्यात अर्धा लीटर दूध आणि केशर घालून मिश्रण २ मिनिटे चांगले उकळून घ्यावे. मिश्रणात मलाई टाकून सतत ढवळत राहावे.
- हे मिश्रण ३ ते ४ मिनिटे चांगले शिजवून घेतल्यानंतर त्यात खवा टाकून मंद आचेवर ढवळत राहावे. आता त्या दूधात तुकडे केलेले बदाम, पिस्ता आणि वेलची पावडर टाकावी. पुन्हा मिश्रण ३ ते ४ मिनिटे चांगले शिजवून घ्यावे.
- दूधात कापलेले बदाम, पिस्ता आणि वेलची पावडर टाकावी. पुन्हा मिश्रण ३ ते ४ मिनिटे चांगले शिजवून घ्यावे.
- दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर घालावी. साखर संपूर्ण विरघळेपर्यंत मिश्रण न थांबता व्यवस्थित ढवळत राहावे.
- दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर मिक्स करावी.
- तयार झाली आहे आपली मन तृप्त करणारी चविष्ट बासुंदी! (Yummy Basundi)
- या बासुंदीचा तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे म्हणजेच गरम असताना किंवा थंड करुन देखील आस्वाद घेऊ शकता. ही बासुंदी पुरीसोबत किंवा नुसतीही सर्व्ह करू शकता.