Vangi Bhat: वांगी भात हा कर्नाटकातील भाताचा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ महाराष्ट्राचा आहे की कर्नाटकचा याबद्दल सांगणे अवघड आहे पण हा पदार्थ मात्र बनवायला खूप सोपा आहे आणि जर तुमच्याकडे पांढरा भात शिजला असेल तर फक्त 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ तयार होऊ शकतो. कसा बनवायचा वांगी भात? (Vangi Bhat) चला पाहुयात.
हे ही वाचा: खमंग भेंडी
Vangi Bhat: साहित्य
- दीड वाटी आंबेमोहोर किंवा कोणताही वासाचा तांदूळ
- 3 ते ४ मध्यम आकाराची वांगी (फोडी करून)
- लवंग (2), नागकेशर (एक टी स्पून), जिरे (1 टे स्पून), धणे (१ १/२ टे स्पून), सुके खोबरे किस (३-४ टे स्पून), चक्रीफुल (१). हे जिन्नस मंद आचेवर भाजून ह्याचा बारीक कोरडा मसाला तयार करावा.
- गोड दही – १ टे स्पून
- काश्मिरी लाल तिखट -१ टे स्पून
- चिंच गूळ पातळ कोळ- पाव वाटी
- आधणाच पाणी -४ वाट्या
- तूप – १ टे स्पून
- मीठ चवीनुसार
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, 2 हिरवी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे.
Vangi Bhat: कृती
- प्रथम तांदूळ धुवून घ्या, पूर्ण पाणी निथळून घ्या.
- आता तांदळाला १ टे स्पून तूप लावा आणि १० मिनिट तसेच ठेवा.
- कुकरमध्ये फोडणीच्या साहित्याची फोडणी करा, त्यात वर तयार केलेला कोरडा मसाला, लाल तिखट घाला आणि त्यात वांग्याच्या फोडी घाला. थोडे परतून घ्या आणि त्यात चिंचेचा कोळ घाला.
- आता त्यात तांदूळ घाला आणि मीठ घाला. 2 मिनिट परतले की त्यात गोड दही घाला. अजून एक मिनिट परतून त्यात पाणी ओता.
- आधण असल्याने लगेच उकळी येईल, उकळी आली की कुकरचे झाकण लावा. ३ शिट्ट्या काढा.
- गरमागरम वांगी भात (Vangi Bhat) दही किंवा बुंदी रायता बरोबर सर्व्ह करा. आवडत असल्यास वरून थोडे साजूक तूप घाला.