fbpx

Khamang Bhendi: खमंग भेंडी

कांदा आणि शेंगदाण्याचे कूट घालून भेंडीची खमंग भाजी (Khamang Bhendi) करता येते. ही भाजी करायला सोपी आणि विशेष म्हणजे अवघ्या १५ मिनिटात तयार करायची होणारी आहे. कशी आहे कृती? चला पाहुयात.

Khamang Bhendi – साहित्य:

  • भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली
  • बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका
  • शेंगदाणे कूट पाव वाटी
  • ४-५ लसूण पाकळ्या (तुकडे करून)
  • २ आमसुले
  • चिमूटभर चाटमसाला/ आमचूर पावडर (ऑप्शनल)
  • फोडणीचे सामान: मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता आणि तेल
  • लाल तिखट १ टीस्पून, धने-जिरे पूड १ टीस्पून, गोडा मसाला १ टीस्पून. मीठ, साखर चवीप्रमाणे.

Khamang Bhendi – कृती:

  • कढईत तेल तापवा आणि त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि कडीपत्ता घालून फोडणी करा.
  • फोडणीतच आमसूल, लसूण तुकडे, कांदा घाला.
  • कांदा परतून गुलाबी होत आला की त्यात दाण्याचं कूट घाला. चमचाभर कूट बाजूला ठेवा.
  • कूट नीट परतून घ्या. बाजूने थोडं तेल सुटायला लागलं की भेंडी घाला.
  • मोठ्या आंचेवर भेंडी हळूहळू परता, आणि उरलेलं दाण्याचं कूट घाला.
  • भेंडी थोडी परतून झाली की मग तिखट, धने-जिरे पूड, गोडा मसाला आणि साखर घाला. चाट मसाला/ आमचूर पावडर घाला.
  • सर्वांत शेवटी मीठ घालून, झाकण न ठेवता भाजी ५ ते ७ मिनिटे खरपूस परतून शिजवून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *